Pulwama Attack: शहीद जवानाच्या पार्थिवाला गृहमंत्र्यांनी दिला खांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 05:52 AM2019-02-16T05:52:51+5:302019-02-16T05:55:04+5:30
शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहेत. या सर्व शहिदांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीनगर : शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहेत. या सर्व शहिदांना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यातील एका जवानाच्या पार्थिवाला राजनाथसिंह, काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी खांदा दिला.
या शहिदांना राज्यपाल सत्यपाल मलिक, गृहसचिव राजीव गौबा, सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनीही आदरांजली अर्पण केली.
काश्मीरमधील स्थितीचा घेतला आढावा
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेऊन काश्मीरमधील स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस राज्यपाल सत्यपाल मलिक व वरिष्ठ पोलीस तसेच सनदी अधिकारी उपस्थित होते.