काश्मीरमध्ये उरीनंतरचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; 40 जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 04:23 PM2019-02-14T16:23:53+5:302019-02-14T17:39:45+5:30

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे.

pulwama ied blast followed by gunshots in goripora area of awantipora | काश्मीरमध्ये उरीनंतरचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; 40 जवानांना वीरमरण

काश्मीरमध्ये उरीनंतरचा आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; 40 जवानांना वीरमरण

Next

जम्मू-काश्मीर- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला.

या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. अतिरेक्यांनी 200 किलो स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन होत्या. या तीन बटालियनमध्ये जवळपास 2500 हजार सैन्य होते. 


सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला. या हल्ल्यात 30 जवान शहीद झाले असून, 20 हून अधिक जवान जखमी आहेत.



सीआरपीएफचे डीजी आर. आर भाटनगर यांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हल्ल्याचा तपास सुरू आहे. हल्ला झाला त्यावेळी 2500 जवानांचा ताफा तिकडून जात होता. जखमींना उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, या दहशतवादी हल्ल्याच्या सर्व शक्यता आम्ही पडताळून पाहत आहोत.



पुलवाम्यात पोलिसांनी नाकाबंदी केली असून, पूर्ण परिसराला घेरलं आहे. तसेच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सीआरपीएफचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2004नंतर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे.



 

Web Title: pulwama ied blast followed by gunshots in goripora area of awantipora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.