मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:48 PM2019-02-15T13:48:48+5:302019-02-15T14:48:46+5:30
Pulwama Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत.
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत. सुखजिंदर सिंग सीआरपीएफच्या 76व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. महिन्याभराच्या सुट्टीनंतर सुखजिंदर सिंग 28 जानेवारी रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झाले होते. कर्तव्य बजावण्यास जाण्यापूर्वी ते वारंवार आपल्या आठ वर्षांचा मुलगा गुरजोत सिंगचा मुका घेत होते.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच सुखजिंदर सिंग यांनी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भाऊ गुरजंट सिंग जंटा यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला होता. यावेळेस त्यांनी भावाला सांगितले की, जम्मू काश्मीरमधील रस्ते काही दिवस बंद असल्याच्या कारणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र आता दुरुस्तीनंतर येथील रस्ते खुले करण्यात आले आहेत. खुल्या करण्यात आलेल्या मार्गावरुन सीआरपीएफच्या 2,547 जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरच्या दिशेनं प्रवास करणार आहे.
गुरजंट सिंग जंटा यांनी सांगितले की, सुखजिंदर सिंग फोनवर वारंवार मुलगा गुरजोत सिंगबाबत विचारपूस करत होते. आपला मुलगा रडत नाहीय ना?, तो ठीक आहे ना?, असे प्रश्न त्यांनी भावाला विचारले. शिवाय, काही दिवसांमध्ये मुलासाठी भरपूर खेळणी पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण काही वेळाने होत्याचे नव्हते झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे वृत्त कुटुंबीयांना समजले आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. हल्ल्यात सुखजिंदर सिंगदेखील शहीद झाल्याचे वृत्त मिळाले. या वृत्तामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
Pulwama Attack: पाकिस्तानची वाट लागणार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढल्यावर 'बाजार उठणार'! https://t.co/fepc065QWR#PulwamaAttack#CRPFKashmirAttack
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 15, 2019
Movement of convoys of security forces has been halted in the Kashmir valley today in wake of the #PulwamaAttack yesterday
— ANI (@ANI) February 15, 2019
भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्ला
दरम्यान, पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी)जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या.
तालिबानी स्टाईलचा हल्ला
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.
स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
काय होता गुप्तचरांचा अॅलर्ट?
या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अॅलर्ट राहावे.
Jammu and Kashmir: Locals protest in Kathua against Pakistan. #PulawamaTerrorAttackpic.twitter.com/o48ZcPo4QA
— ANI (@ANI) February 15, 2019
#Jammu: Curfew imposed at Bus Stand, Nawabad,Bakshi Nagar,Peer Mitha,Pacca Danga,Channi Himmat,Janipur,Domana,and Bagh-E-Bahu areas
— ANI (@ANI) February 15, 2019
देशाच्या आत्म्यावरचा हल्ला, सर्व विरोधक केंद्रासोबत - राहुल गांधी https://t.co/MZiK1FDQ9h@RahulGandhi#PulwamaTerrorAttack@narendramodi
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 15, 2019