पंक्चर झालेला ट्रक चालकाविना धावला, महिलेसह दोघांचा मृत्यू , हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 03:45 PM2021-11-10T15:45:57+5:302021-11-10T15:46:38+5:30
Accident in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात पंक्चर टायर बदलण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा केलेला विटांनी भरलेला ट्रक जॅक निखळल्याने पुढे सरकला. या ट्रकखाली सापडून चालक आमि एका महिलेचा मृत्यू झाला.
मंडी - हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात पंक्चर टायर बदलण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा केलेला विटांनी भरलेला ट्रक जॅक निखळल्याने पुढे सरकला. या ट्रकखाली सापडून चालक आमि एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सरकाघाट मंडळाअंतर्गत येणाऱ्या सुलपूर बही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बही गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक एचपी २८, सी ५५६० होशियारपूर येथून सप्लाय घेऊन येथे आला होता. बही गावाजवळ ट्रकचा टायर पंक्चर झाला. टायर बदलण्यासाठी चालकाने हा ट्रक रस्त्याशेजारी उभा केला. त्याने जॅक लावून टायर बदलण्याचे काम सुरू केले. याच गावातील ५५ वर्षीय ब्रह्मी देवी ही महिला कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. दरम्यान, ट्रकला लावलेला जॅक अचानक निसटला आणि पुढे सरकला आणि काही अंतरावर जाऊन पलटी झाला.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील एकाची ओळख ट्रकचालक राकेश कुमार आणि ब्रह्मी देवी अशी पटली आहे. ब्रह्मी देवी जलशक्ती विभागामध्ये कार्यरत होती. दरम्यान, पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून, तक्रार दाखल केली आहे.