पंडित कातड सहा महिन्यांसाठी तडीपार
By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:26+5:302015-07-11T00:18:34+5:30
नाशिक : मातोरी येथील जमीन खरेदी व्यवहारात खंडणीचा गुन्हा दाखल असलेले संशयित पंडित रंगनाथ कातड (पाटील) यांना मुंबई उच्च न्यायालयाने शहर परिसर तसेच मातोरी गावातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत़ याबरोबरच आठवड्यातून दोन दिवस सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे़

मातोरी येथील जमीन खरेदी करणारे बांधकाम व्यावसायिक अर्जुन खेतवाणी व त्यांचे व्यावसायिक भागीदार अमित बोरस्ते यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ या गुन्ामधील इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला होता़
याबाबत खेतवाणी व बोरस्ते यांनी कातड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती़ यावर न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी सहा महिन्यांकरिता संशयित पंडित रंगनाथ कातड (पाटील) यांना सहा महिन्यांकरिता नाशिक शहर व मातोरी गावात प्रवेशबंदीचा निर्णय दिला़ तसेच आठवड्यातील बुधवार व शनिवार असे दोन दिवस सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे़ या आदेशाचे उल्लंघन केल्यास कातड यांना अटक करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)