पुण्यात आनंदी आनंद गडे... देशातील आनंदी शहरांमध्ये मुंबई, नागपूरला टाकलं मागे

By मोरेश्वर येरम | Published: January 6, 2021 09:28 PM2021-01-06T21:28:51+5:302021-01-06T21:41:36+5:30

देशातील सर्वात आनंदी शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश

pune Gains 12th Place As Happiest City In India First In Maharashtra | पुण्यात आनंदी आनंद गडे... देशातील आनंदी शहरांमध्ये मुंबई, नागपूरला टाकलं मागे

पुण्यात आनंदी आनंद गडे... देशातील आनंदी शहरांमध्ये मुंबई, नागपूरला टाकलं मागे

Next
ठळक मुद्दे'इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०'मध्ये पुण्याने पटकावला १२ वा क्रमांकमहाराष्ट्रातीन तीन शहरांचा सर्वात आनंदी शहरांमध्ये समावेशलुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगढ देशातील सर्वात आनंदी शहरं

पुणे
भारतातील सर्वात आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पुणे शहरानं १२ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, पुणेकरांनी आनंदी राहण्याच्या बाबतीत मुंबईकर आणि नागपूरकरांनाही मागे टाकलं आहे. 

'इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०'मध्ये देशातील आनंदी शहरांची २५ नावांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. पुण्याला १२ वं, नागपूरला १७ वं आणि मुंबईला २१ वं स्थान मिळालं आहे. 

प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील विविध शहरांमध्ये १३ हजार लोकांहून अधिक जणांचे सर्वेक्षण करुन यादी तयार केली आहे. राजेश पिल्लानिया हे गेल्या दशकभरापासून व्यवस्थापनातील संशोधनाचं काम करत आहेत. 

पहिल्या तीन स्थानावर कोणती शहरं?
आनंदी शहरांच्या यादीत लुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगड या शहरांनी अनुक्रमे पहिलं, दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलं आहे. तर टू-टियर शहरांमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली सर्वाधिक आनंदी शहरं ठरली आहेत. 

कशी निवडली गेली शहरं?
आनंदी शहरांची निवड वयोमान, शिक्षण, कमाई आणि एकंदरीत एखाद्या शहरात राहताना तिथं मिळणाऱ्या सुखसोयी व जीवनशैली यांच्या आधारावर यादी तयार करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मोठ्या शहरांमध्ये अविवाहित नागरिक हे विवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचंही दिसून आलं आहे.

Web Title: pune Gains 12th Place As Happiest City In India First In Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.