आदिवासींच्या मुळावर उठला पुणे महानगर पालिकेचा कचरा
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:53+5:302015-02-14T23:51:53+5:30
प्लॉस्टिक कचरा : आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
Next
प लॉस्टिक कचरा : आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशाराघोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये आज दि़ १४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास पुणे महानगर पालिकेच्या सुमारे २५ गाडयांनी कचरा आणून टाकला़ या कचर्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून, यामुळे येथील पर्यावरणाला, जनावरांना धोका पोहचणार आहे़ हा कचरा महानगर पालिकेने तात्काळ उचलून घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महानगरपालिके बाहेर तीव्र आंदोलन करतील असा इशारा पंचायत समिती उपसभापती सुभाष तळपे यांनी दिला आहे़ गोहे बुद्रूकची उभेवाडी उंच डोंगरावर वसलेली छोटीशी वस्ती आहे़ पुण्यापासून १०० किलोमीटर अंतर आहे़ या ठिकाणी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास सलग २५ ते ३० गाडया आल्या़ येथील ग्रामस्थांना काही कळायच्या आत या गाडयांमध्ये भरलेला कचरा एका पटांगणावर खाली करून निघून गेल्या़ या कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता प्लास्टिक व खाणीने भरलेले ढिग त्यांना दिसले़ ग्रामस्थांनी चौकशी केली असता, शेतीसाठी खत म्हणून महानगरपालिका कचरा देते. गोहे येथे रहाणार्या व पुणे महानगरपालिकेत कामाला असणार्या मोघाजी उभे यांनी खतासाठी हा कचरा टाकायला लावला आहे़ त्यांनी दाखविलेल्या जागेनुसार पुणे महानगरपालिकेच्या गाडयांनी येथे कचरा खाली केला़ मोघाजी उभे महानगरपलिकेत सॅनेटरी इन्स्पेक्टर असून दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेची गाडी येऊन पहाणी करून गेली होती, असे ग्रामस्थ सिताराम जोशी, रामचंद्र गेंगजे, वामन जोशी, इंदुबाई गेंगजे, किसन गेंगजे, सितराम गंेगजे, रमेश गेंगजे, दत्तात्रय गेंगजे यांनी सांगितले़ग्रामपंचायतची परवानगी न घेता कोणालाही न विचारता हा कचरा पुणे महानगरपालिकेने टाकला आहे़ हा कचरा पुणे महानगरपालिकेने घेऊन जावा अन्यथा गोहे ग्रामस्थ पुणे महानगर पालिकेवर मोर्चा आणतील, हा कचरा महानगरपालिके बाहेर आणून टाकला जाईल, तसेच पुन्हा गाडया येऊ नयेत यासाठी येथे पोहचणार्या रस्त्याला रात्री दगडी लावून ठेवल्या जातील व एक गाडी देखील जाग्यावर येऊ देणार नसल्याचे उपसभापती सुभाष तळपे यांनी सांगितले़ प्लॉस्टिकचा कचराया कचर्यातून खत कसे होऊ शकते हे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी येऊन दाखवावे़ हे प्लास्टिक जनावर्यांच्या पोटात जाऊन त्यांना आजार होतील़ हा कचरा रानात पसरले, प्लास्टिकमुळे झाडे उगवणार नाहीत, पर्यावरणाचा र्हास होईल़ शहरीकरणामध्ये आमच्या आदिवासींचा बळी घेऊ नका, काबड कष्ट करून आदिवासी शेतकरी जगतात, मानव निमित्त आपत्ती आमच्यावर नको, खाजगी जागेत जरी कोणी कचरा टाकत असले तरी आम्ही कचरा टाकू देणार नाही़ पुन्हा महानगरपालिकेची माणसे व गाडया येथे आल्या तर त्यांनी परत नीट जाऊ देणार नाही, असे सिताराम जोशी यांनी सांगितले़ तसेच याबाबत आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, गोहे गावच्या हद्दीत कचरा टाकणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, या कृतीमुळे ग्रामस्थांमध्येही संताप पसरला आहे़ पुणे महानगरपालिकेने कोणाचीही संमती न घेता अशा प्रकारे कचरा टाकला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो़ टाकलेला हा कचरा महानगरपालिकेने त्वरीत घेऊन जावा व यापुढे महानगरपालिकेंनी आदिवासी पट्टयात कुठेही कचरा टाके नये अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे त्यांनी सांगितले़ ़़़़़़़़़़़़़़़140202015़हीवक़02 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा पहाताना उपसभापती सुभाष तळपे व ग्रामस्थ 140202015़हीवक़03 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडीमध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा पहाताना उपसभापती सुभाष तळपे, सिताराम जोशी व ग्रामस्थ 140202015़हीवक़04 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये पुणे महानगरपालिकेने आणून टाकलेला कचरा 140202015़हीवक़05 दृ गोहे बुद्रूक गावच्या हद्दीत उभेवाडी मध्ये डांेगराच्या पठारावर पुणे महानगर पालिकेच्या सुमारे २५ गाडयांनी आणून टाकलेला कचरा छाया -निलेश काण्णव