पुणे-पिंपरीच्या घोळाने स्मार्ट सिटीची यादी लांबली
By admin | Published: August 11, 2015 11:45 PM2015-08-11T23:45:09+5:302015-08-11T23:45:09+5:30
पुणे : शहरांमध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाकडून राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी योजनेत राज्यशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा एकत्रित समावेश केल्याने केंद्र शासनाचीही अडचण झाली आहे. या दोन्ही शहरांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने देशातील इतर 100 शहरांच्या यादीची निवड प्रक्रीया रखडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे या योजनेत पुण्याचा आणि पिंपरीचा समावेश वेगळी शहरे म्हणूनच होण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनीही स्पष्ट केले.
Next
प णे : शहरांमध्ये पायाभूत सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाकडून राबविण्यात येणा-या स्मार्ट सिटी योजनेत राज्यशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा एकत्रित समावेश केल्याने केंद्र शासनाचीही अडचण झाली आहे. या दोन्ही शहरांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने देशातील इतर 100 शहरांच्या यादीची निवड प्रक्रीया रखडली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे या योजनेत पुण्याचा आणि पिंपरीचा समावेश वेगळी शहरे म्हणूनच होण्याची शक्यता असल्याचेही सुत्रांनीही स्पष्ट केले. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये शहरांची निवड करताना केंद्र सरकारने राज्याला दहा शहरांची निवड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, दोन्ही शहरांची काही प्रमुख कार्यालये तसेच समस्या एकसारख्या असल्याचे कारण पुढे करीत शासनाने ही दोन्ही शहरे एकत्र करून राज्यातील अकरा शहरांची शिफारस करण्याचा घाट घातला आहे. मात्र, अशा प्रकारे शहरे एकत्र करणे केंद्रशासनाच्या निकषातच बसत नसल्याने केंद्राला अद्याप अंतिम 100 शहरांची निवड करणे शक्य झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मागील आठवडयातच ही यादी जाहीर होणे अपेक्षीत असतानाही, अद्याप ती अंतिम करता आलेली नाही. एक शहर कमी केल्यानंतरच ही यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले. ==========