पुण्याच्या १६ गिर्यारोहकांची सुटका
By admin | Published: April 28, 2015 11:58 PM2015-04-28T23:58:42+5:302015-04-28T23:58:42+5:30
भारतीय हवाईदलाने माऊंट एव्हरेस्ट भागात अडकून पडलेल्या पुणे (महाराष्ट्र) येथील १६ गिर्यारोहकांची मंगळवारी सुटका केली.
काठमांडू : भारतीय हवाईदलाने माऊंट एव्हरेस्ट भागात अडकून पडलेल्या पुणे (महाराष्ट्र) येथील १६ गिर्यारोहकांची मंगळवारी सुटका केली. यात ११ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. हा चमू लुकला येथून माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पला जात होता; मात्र भूकंप आणि त्यानंतरच्या हिमस्खलनामुळे हे गिरीप्रेमी अर्ध्या वाटेतच अडकून पडले होते.
पुढे जाता येत नव्हते, तसेच मार्ग खचल्यामुळे मागेही फिरता येत नव्हते. अशा स्थितीत या चमूने नेपाळी लष्कराच्या मैदानावर तंबू ठोकून कसेतरी दोन दिवस काढले. त्यानंतर हा चमू हेलिकॉप्टरने लुकला येथे दाखल झाला आणि तेथून भारतीय हवाईदलाच्या विमानाने त्यांना मायदेशी आणले.
सह्याद्री पर्वतराजीत गिरीभ्रमणाचा आम्हाला अनुभव आहे; मात्र यावेळी प्रथमच आम्ही हिमालयात गिर्यारोहण करण्याचा निर्णय घेतला, असे गिर्यारोहणाची ही मोहीम हाती घेणारे राकेश निभजाया यांनी सांगितले.
या चमूसोबत श्रावणी कुलकर्णी ही सातवीची विद्यार्थिनी होती. ११ वर्षांच्या श्रावणीने गिर्यारोहणाचा हा पहिला अनुभव आनंददायी होता, असे सांगितले. (वृत्तसंस्था)
काठमांडू : भूकंपानंतर ५० तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या नेपाळी महिलेला भारतीय बचाव कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. सुनीता सितौला असे या सुदैवी महिलेचे नाव आहे.
येथील बसुंधरा भागातील ५ मजली इमारत कोसळल्यानंतर सुनीता या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. सुनीता इमारतीच्या दोन स्लॅबमधील रिकाम्या पोकळीत सुरक्षित होती. सुटकेनंतर तिला नजीकच्या रुग्णालयात व प्रथमोपचारानंतर स्थानिक शाळेतील शिबिरात हलविले.
हलविण्यात आले. सुटका झाल्यानंतर आपण वेगळ्या जगात आलो आहोत, असे आपणास वाटत असल्याची प्रतिक्रिया सुनीताने व्यक्त केली. सुनीताचा पती व दोन मुले भूकंपाच्या तडाख्यात सापडली नव्हती.