धक्कादायक! शाळेत छोट्या चुकांसाठी शौचालयात दिली शिक्षा, केरळमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:09 IST2025-01-31T13:07:29+5:302025-01-31T13:09:04+5:30
केरळमध्या १५ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! शाळेत छोट्या चुकांसाठी शौचालयात दिली शिक्षा, केरळमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
केरळच्या कोची येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोची येथील त्रिप्पुनिरामध्ये नववीत शिकणाऱ्या मिहिर अहमद या विद्यार्थ्याने आपल्या फ्लॅटमधून खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५ वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येने केरळमध्ये खळबळ उडाली आहे. एवढ्या लहान वयात या विद्यार्थ्याला आत्महत्या का केली?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आता या आत्महत्येमागील कारण समोर आले आहे.
"चेंगराचेंगरी झाली, आम्ही जमिनीवर पडलो, ४० मिनिटं लोक आमच्या अंगावरुन जात राहिले अन्..."
या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. या पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. कुटुबीयांनी ३० जानेवारी ही तक्रार दाखल केली.
मुलाला शाळेत प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला, आहे असा आरोप त्याच्या आईने केला. मिहिर देखील काही विद्यार्थ्यांकडून क्रूर रॅगिंगचा बळी ठरला होता, असा दावाही त्यांनी केला.
ही घटना १५ जानेवारी रोजी त्रिपुनिथुरा येथील चॉइस पॅराडाईज टॉवरमध्ये घडली. मिहीर फ्लॅटच्या २६ व्या मजल्यावरून उडी मारली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो तिरुवानीयर ग्लोबल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी होता.
मित्रांसोबत केलेले चॅटींगमुळे झाला खुलासा
मिहिरच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रांच्या चॅटींगवरुन घरच्यांना संशय आला. त्यांनी ग्लोबल पब्लिक स्कूलविरुद्ध तक्रार दाखल केली, मिहिर याला किरकोळ चुकांसाठीही अमानुष शिक्षा दिली जात होती, असा आरोप त्यांनी केला.
चॉइस पॅराडाईज टॉवरचे मालक रॉबिन जोस आणि जोस मॅथ्यू यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून १५ जानेवारी रोजी त्रिपुनिथुरा हिल पॅलेस पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत एफआयआर नोंदवला. मिहिरच्या आईने बाल कल्याण आयोगाकडेही संपर्क साधला आहे,त्याच्या शाळेतील, जीईएमएस कोचीच्या उपप्राचार्यांकडून त्याचा छळ झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिहिर याच्या आईने या आत्महत्येवरुन मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी महिरला तीन महिन्यापूर्वीच त्या शाळेत प्रवेश घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर, त्यांनी त्याया काही मैत्रिणी आणि वर्गमित्रांशी बोलल्या आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चॅटींग उघडकीस आणली.
मिहिरला शाळेत आणि स्कूल बसमध्येही गैरवर्तनाचा सामना करावा लागला. त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या त्वचेच्या रंगाबद्दल त्याची अनेकदा खिल्ली उडवली, यामुळे तो खूप तणावात होता.
या चॅटींगमधून आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. त्या एका छोट्या चुकीसाठी शौचालये चाटण्यास भाग पाडले जात होते. एका चॅटमध्ये त्याने सांगितले की, शौचालय फ्लश करताना त्याने त्याचे डोके कमोडमध्ये घातले होते, असा धक्कादायक खुलासा केला आहे.