दूध भेसळखोरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय

By admin | Published: August 6, 2016 07:29 AM2016-08-06T07:29:28+5:302016-08-06T07:45:06+5:30

सर्वोच्च न्यायालयानं दुधात भेसळ करणा-यांना कडक शिक्षा देण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे.

Punishment for milk adulterants to life imprisonment - Supreme Court | दूध भेसळखोरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय

दूध भेसळखोरांना आजन्म कारावासाची शिक्षा द्या - सर्वोच्च न्यायालय

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- दुधाशिवाय आपण एकही दिवस राहू शकत नाही. लहान मुलांसाठी तर हे दूध म्हणजे पूर्णान्न आहे. मात्र या दुधात भेसळ होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयानं याची गंभीर दखल घेतली असून कडक शिक्षा देण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. दुधभेसळ करणा-यांना देण्यात येणारी 6 महिन्यांची शिक्षा आणि दंड पुरेसं नसूल त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा दिली तरी हरकत नाही असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. 
 
 सर्वोच्च न्यायालयातील मुख्य खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलं आहे. भेसळयुक्त दूध वाढत्या वयातील मुलांच्या शरीरिक प्रक्रियांवर परिमाण करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 
 
उत्तर प्रदेश, प. बंगाल, ओडिशा राज्यांत दूध भेसळखोरांना आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी आधीच कायदे अस्तित्वात आहेत. मात्र हे कायदे आता देशभरात राबवण्याची गरज असल्याचंही मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं 2011च्या दूध भेसळीच्या अहवालाचा संदर्भ देत अन्न सुरक्षा आणि एफएसएसएआयनं विक्री केलेल्या 68 टक्के दुधात भेसळ असल्याचं समोर आल्याचं यावेळी सांगितलं आहे.
 

Web Title: Punishment for milk adulterants to life imprisonment - Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.