Punjab AAP: पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 06:27 PM2022-03-13T18:27:58+5:302022-03-13T18:55:06+5:30

Punjab AAP:'आप'चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान येत्या 16 मार्च रोजी शहीद भगत सिंग यांच्या खटकर कलान या गावी शपथ घेणार आहेत.

Punjab | AAP | Arvind Kejriwal | Bhagwant Maan | If AAP's minister-MLA commits scam, direct imprisonment; Arvind Kejriwal's warning | Punjab AAP: पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा

Punjab AAP: पंजाबमध्ये मंत्र्याने-आमदाराने घोटाळा केला तर थेट तुरुंगवास; अरविंद केजरीवाल यांचा इशारा

googlenewsNext

अमृतसर: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांचा रविवारी अमृतसरमध्ये मेगा रोड शो झाला. यावेळी पंजाबच्या जनतेला संबोधित करताना त्यांनी भगवंत मान यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच, आम आदमी पक्षाच्या आमदारांसह इतर आमदारांना कडक शब्दात इशाराही दिला.

'भगवंत मान अतिशय प्रमाणिक'
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''माझा लहान भाऊ भगवंत मान(bhagwant Maan) हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे. पंजाबला आतापर्यंतचा सर्वात प्रामाणिक मुख्यमंत्री मिळाला आहे. पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार स्थापन होईल. आमच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा राज्यातील कुठल्याही आमदाराने पैशांचा घोटाळा केला, तर त्याला थेट तुरुंगात टाकले जाईल. काही लोक पंजाबला लुटत होते, आता ही लूट थांबेल. आता सरकारचा प्रत्येक पैसा गरिबांवर खर्च केला जाईल, पंजाबवर खर्च केला जाईल.''

'दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार'
ते पुढे म्हणाले की, ''आपने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. काहींना वेळ लागेल, काही लगेच पूर्ण होतील, पण पूर्ण नक्की होतील. 16 मार्चला भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, पण त्या दिवशी फक्त भगवंत मान मुख्यमंत्री होणार नाहीत, तर पंजाबचा प्रत्येक मुलगा मुख्यमंत्री होईल.'' यावेळी केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्या दिवशी पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.

'संपूर्ण जगाने पंजाबचा विक्रम पाहिला'
यावेळी भगवंत मान म्हणाले की, ''पंजाबच्या कानाकोपऱ्यातील पंजाबींनी 10 मार्चला जो विक्रम नोंदवला, तो यापूर्वी कधीच घडला नव्हता. हा विक्रम संपूर्ण जगाने पाहिला. तुम्ही चांगल्या कामांना मत दिले, लुटारुंचा 50-50 हजार मतांनी पराभव केला आहे.''

'पोलिसांचे काम पोलिस करतील'
भगवंत मान पुढे म्हणाले की, ''आप हा चळवळीबाहेरचा पक्ष आहे. उपोषण करुन तयार झालेला हा पक्ष आहे. पहिल्या दिवसापासून या सरकार जोमाने काम करेल. आम्ही पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी 122 माजी नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पोलिसांना पोलिसांची कामे करायला मिळतील, त्यांना त्रास होणार नाही.''

रोड शोपूर्वी सुवर्ण मंदिरात नतमस्तक 
रोड शो काढण्यापूर्वी आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान सुवर्ण मंदिरात नतमस्तक झाले. तत्पूर्वी, मान यांनी केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे विमानतळावर स्वागत केले. 11 मार्च रोजी मोहाली येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 16 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता नवाशहर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे होणार आहे. 

Web Title: Punjab | AAP | Arvind Kejriwal | Bhagwant Maan | If AAP's minister-MLA commits scam, direct imprisonment; Arvind Kejriwal's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.