३५० रुपये आणि जेवण; केजरीवालांनी सभेसाठी पैसे देऊन जमवली माणसं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 04:02 PM2018-03-26T16:02:29+5:302018-03-26T16:02:29+5:30

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे.

punjab and haryana hisar people claims that they were hired for aam aadmi party chief arvind kejriwals hisar rally | ३५० रुपये आणि जेवण; केजरीवालांनी सभेसाठी पैसे देऊन जमवली माणसं ?

३५० रुपये आणि जेवण; केजरीवालांनी सभेसाठी पैसे देऊन जमवली माणसं ?

Next

हिसार- नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. हरियाणात आम आदमी पार्टीचं सरकार आल्यास शेतक-यांसाठी आयोगाच्या शिफारशी लागू होतीलच. तसेच स्वास्थ्य, शिक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही चांगलं काम केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं होतं. परंतु आता त्यांच्या रॅलीसंदर्भात जी माहिती मिळत आहे, ती आश्चर्यचकित करणारी आहे.

केजरीवाल मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहिलेल्या कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवरच गंभीर आरोप केले आहेत. मिश्रा यांनी केजरीवालांच्या रॅलीनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत रॅलीमध्ये आलेली काही माणसे दावा करत आहेत की, रॅलीसाठी आम्हाला 350 रुपये आणि जेवण देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीची टी-शर्ट आणि टोपी घालून रॅलीमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं. व्हिडीओमध्ये एका मजुरानं या प्रकाराला वाचा फोडली आहे.



तो म्हणाला, रॅली संपल्यानंतर तुम्हाला 350 रुपये देणार असं सांगण्यात आलं होतं. 350 रुपये देऊन आम्हाला बोलावलं होतं. आम्ही एकूण 118 लोक आलो होतो. परंतु आता उद्या पैसे घेऊन जा, असं सांगितलं जातंय. तर दुस-या एका व्हिडीओमध्ये काही मजुरांनी दावा केला आहे की, आम्ही बहादूरगडच्या मंडी येथे राहत असून, आम्हाला रॅलीला चहा-नाश्तासकट पैसे देण्याचं कबूल केलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ही रॅली काढली होती.


हरियाणाच्या हुड्डा सरकारनं जो भ्रष्टाचार सुरू केला. तो भ्रष्टाचार खट्टर सरकारनं पाच पटीनं वाढवला आहे, असं केजरीवाल म्हणाले होते. भाजपा आणि काँग्रेसनं मतांच्या राजकारणासाठी हरियाणात जाट आणि इतर समाजांमध्ये दंगली भडकावल्या होत्या. गेल्या तीन वर्षांत हरियाणात जातीवादाच्या नावाखाली खूप हिंसा झाली आहे. परंतु खट्टर सरकार गाढ झोपेत आहे. देशातल्या बँका असुरक्षित असल्याचंही केजरीवालांनी सांगितलं आहे. नीरव मोदी आणि विजय माल्याला परत भारतात केव्हा आणणार, असा प्रश्नही विचारला आहे. 

Web Title: punjab and haryana hisar people claims that they were hired for aam aadmi party chief arvind kejriwals hisar rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.