Punjab Assembly Election 2022 : मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमीचा 'खास' माणूस, केजरीवालांनी पंजाबसाठी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:37 PM2022-01-18T12:37:50+5:302022-01-18T13:31:40+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे
नवी दिल्ली - देशभरात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Election 2022) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाच राज्यांपैकी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाब आणि गोवा या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आपची जादू पहायला मिळाली आहे. त्यामुळे, येथे आम आदमी पक्षाचे प्रभुत्वही दिसून येते. आता, पंजाबमधील निवडणुकांसाठी आपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत असून भाजपचेही आव्हान या दोन्ही पक्षांनी असणार आहे. तसेच, तेथील प्रादेशिक पक्षांनाही आम आदमीला तोंड द्यावे लागणार आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलन, व यावेळी राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका या निवडणुकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
Aam Aadmi Party Lok Sabha MP from Sangrur constituency in Punjab Bhagwant Mann will be the party's chief ministerial candidate for the upcoming Assembly elections: Delhi CM & Aam Aadmi Party's national convenor Arvind Kejriwal#PunjabAssemblyelections2022pic.twitter.com/Tkg0lb7B3K
— ANI (@ANI) January 18, 2022
भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे नेते असून सध्या पंजाबमधील संग्रुर लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले आहेत. त्यामुळे, केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणा करत आपला पत्ता ओपन केला आहे. आता, भाजपा आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणता उमेदवार घोषित होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
#WATCH | Delhi CM & Aam Aadmi Party's national convenor Arvind Kejriwal announces party's chief ministerial candidate for the upcoming Punjab Assembly elections pic.twitter.com/cBEsKHAhEu
— ANI (@ANI) January 18, 2022
दरम्यान, पंजाब विधानसभेच्या ११७ निवडणुकांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.