Punjab Assembly Election Results 2022: ५ वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार पराभवाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:32 AM2022-03-10T11:32:45+5:302022-03-10T11:34:07+5:30

पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२: यंदा आम आदमी पार्टी दुसऱ्या राजकीय पक्षांचं स्वप्न धुळीस मिळवत आहे.

Punjab Assembly Election Results 2022:CM Parkash Singh Badal is trailing from Lambi seat in Punjab | Punjab Assembly Election Results 2022: ५ वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार पराभवाच्या छायेत

Punjab Assembly Election Results 2022: ५ वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार पराभवाच्या छायेत

Next

अमृतसर – देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालाचे कल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. त्यात पंजाब विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने सत्ताधारी काँग्रेस पक्षाची साफसफाई केल्याचं दिसून येत आहे. पंजाबमध्ये एकूण ११७ जागांपैकी ८९ जागांवर ‘आप’नं जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला ४० जागा जिंकणंही कठीण झालं आहे. सध्या काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे.

पंजाब निवडणुकीच्या निकालाने अनेक दिग्गजांना धक्के दिले आहेत. याठिकाणी देशातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार आणि ५ वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंग बादल(Prakash Singh Badal) यांचा लंबी विधानसभा मतदारसंघात पराभव होण्याची चिन्हं आहेत. याठिकाणी आम आदमी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. ९४ वर्षीय प्रकाश सिंह बादल मागील १३ वर्षापासून लंबी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र यंदा आपचे उमेदवार गुरमीत सिंग यांनी त्यांना पिछाडीवर टाकलं आहे. मतमोजणीत सुरुवातीच्या कलात प्रकाश सिंग बादल १४०० मतांनी मागे आहेत.(Punjab Assembly Election 2022)

पंजाब निवडणूक निकाल २०२२ मध्ये यंदा आम आदमी पार्टी दुसऱ्या राजकीय पक्षांचं स्वप्न धुळीस मिळवत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या लाटेत प्रकाश सिंग बादलही वाचले नाहीत. विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीत लंबी मतदारसंघ VVIP सह सगळ्यात चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. याठिकाणी दरवेळी बादल त्यांच्या विरोधकांना फटका देतात. प्रकाश सिंग बादल हे सर्वात वयोवृद्ध उमेदवार असल्यासोबत त्यांच्या नावावर पंजाबचे सर्वात युवा मुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्डही आहे. १९७० मध्ये ते ४३ वर्षीय असताना पंजाबचे सीएम बनले होते.( Punjab Election Result 2022)

यंदाच्या निवडणुकीत कोरोना संक्रमित झाल्यानंतरही प्रकाश सिंग बादल निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले. पंजाबच्या राजकारणात शिरोमणी अकाली दल मजबूत ठेवण्यासाठी प्रकाश सिंग बादल यांची भूमिका महत्त्वाची आहे. लंबी विधानसभा मतदारसंघात प्रकाश सिंह बादल पिछाडीवर आहेत. २०१७ च्या निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रकाश सिंग बादल यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु कॅप्टन यांना २२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

Web Title: Punjab Assembly Election Results 2022:CM Parkash Singh Badal is trailing from Lambi seat in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.