Punjab Assembly Election Result: पंजाबमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; केजरीवालांच्या झाडूनं काँग्रेसची साफसफाई; दिग्गज पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:19 IST2022-03-10T09:58:11+5:302022-03-10T12:19:30+5:30
Punjab Assembly Election Result: आपचा झाडू जोरात; काँग्रेसला पंजाबमध्ये जोरदार धक्का

Punjab Assembly Election Result: पंजाबमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; केजरीवालांच्या झाडूनं काँग्रेसची साफसफाई; दिग्गज पिछाडीवर
चंदिगढ: पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आम आदमी पक्षानं सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. ११७ मतदारसंघ असलेल्या पंजाबमध्ये आप ७७ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे आपच्या मुसंडीमुळे काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत.
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पिछाडीवर आहेत. बरनाला जिल्ह्यातील भदौर विधानसभा मतदारसंघात चरणजीत सिंग चन्नी मागे आहेत. या मतदारसंघात आपचे उमेदवार लाभ सिंग उग्गोके आघाडीवर आहेत. पंजाबचे कृषिमंत्री रणदीप सिंगदेखील पिछाडीवर आहेत.
अमृतसर पूर्व मतदारसंघात नवज्योत सिंग सिद्धू आणि विक्रम सिंग मजेठिया पिछाडीवर आहेत. इथे आपच्या जीवन ज्योत आघाडीवर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चमकौर साहेब आणि भदौडर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात ते पिछाडीवर आहेत. दोन्ही जागांवर आपचे उमेदवार पुढे आहेत. अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद मोगा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर आहे.