Punjab Assembly Elections 2022: पंजाबमध्ये आम आदमी पार्टी जिंकताच, युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy सोशल मीडियावर ट्रेंड; जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 07:59 PM2022-03-10T19:59:50+5:302022-03-10T20:01:03+5:30
जेव्हा एकीकडे पंजाब निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल आपच्या बाजूने यायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुकवर युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy ट्रेंड व्हायलाही सुरुवात झाली.
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (AAP) मोठा विजय मिळवला आहे. जेव्हा एकीकडे पंजाब निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल आपच्या बाजूने यायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुकवर युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy ट्रेंड व्हायलाही सुरुवात झाली. खरे तर, सोशल मीडिया यूजर्सनी आम आदमी पार्टीचे सीएम फेस असलेल्या भगवंत मान यांची तुलना Volodymyr Zelenskyy यांच्यासोबत करायला सुरुवात केली. कारण झेलेन्स्कीदेखील कधी काळी भगवंत मान यांच्याप्रमाणेच कॉमेडियन होते.
Our own Indian Zelensky#Bhagwantmann#ElectionResultspic.twitter.com/1kBf72Cn11
— Free Guy (@TheFree_Guy) March 10, 2022
झेलेन्स्की हे युक्रेनमधील प्रसिद्ध कॉमेडी शो KVN मध्ये परफॉरमन्स करत होते. ते 2003 पर्यंत या शोमध्ये होते. टेलीव्हिजन शिवाय झेलेन्स्की यांनी Rzhevskiy Versus Napoleon (2012) आणि रोमँटिक कॉमेडी फिल्म 8 First Dates (2012) आणि 8 New Dates (2015) मध्येही काम केले आहे.
Both start with Comedy
— 🇮🇳 Sachin Patel 🇺🇸 (@Unfortunate_Er) March 10, 2022
Now delivering pure performance#Bhagwantmann#Zelensky#AAPRisingpic.twitter.com/D4loecsWV5
तर, भगवंत मान यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, राजकारणात येण्यापूर्वी, त्यांनी नॅशनल टेलीव्हिजनसह अनेक पंजाबी कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. त्यांचा जुगनू मस्त मस्त हा शो प्रचंड प्रसिद्ध झाला होता.
भगवंत मान आणि झेलेन्स्की यांची तुलना करणारे आणखी काही खास ट्विट -
From Comedian to Mass Leader#Bhagwantmann is new #Zelenskyy#PunjabElectionspic.twitter.com/nME1nYwf4H
— Mayur ☮️🕊️ (@Mayur9x) March 10, 2022
#BhagwantMann is going to be #Zelenskyy of Punjab. Both comedians by profession.
— Aquib Mir 🇮🇳. (@aquibmir71) March 10, 2022