Punjab Assembly Elections: कुमार विश्वास यांच्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाने आधी बंदी घातली, नंतर परवानगी दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 09:54 AM2022-02-18T09:54:39+5:302022-02-18T09:54:58+5:30

Punjab Assembly Elections: निवडणूक आयोगाने कवी कुमार विश्वास यांचा व्हिडिओ प्ले करण्यावर बंदी घातली होती. याबाबतचे पत्रही देण्यात आले. मात्र काही तासांनंतर हा आदेश मागे घेण्यात आला.

Punjab Assembly Elections | Kumar Vishwas | Election Commission | Kumar Vishwas's video was first banned by the Election Commission, then allowed | Punjab Assembly Elections: कुमार विश्वास यांच्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाने आधी बंदी घातली, नंतर परवानगी दिली

Punjab Assembly Elections: कुमार विश्वास यांच्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाने आधी बंदी घातली, नंतर परवानगी दिली

Next

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) तोंडावर पंजाबमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास(Kumar Vishwas) यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर 'आप' बॅकफूटवर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(CM Arvind Kejriwal)  यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. 

'आप'च्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने व्हिडिओच्या प्रसारणावर बंदी घातली होती. मात्र तासाभरानंतरच ती बंदी काढण्यात आली. राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी एका पत्रात राजकीय पक्षांना व्हिडिओ प्रसारित करू नये असे सांगितले होते. मात्र काही तासांनंतर हा आदेश मागे घेण्यात आला.

पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस करुणा राजू यांनी सांगितले की, हे पत्र “नकळत” चुकून जारी करण्यात आले आहे. कुमार विश्वास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. याचाच एक भाग ANI ने ट्विट केला होता, जो खूप व्हायरल होत आहे. यामध्ये कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी घटकांशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी संध्याकाळी AAP पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी निवडणूक आयोगाचे पत्र ट्विट केले, "पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ANI ला दिलेला कुमार विश्वास यांचा प्रक्षोभक व्हिडिओ मीडिया तसेच राजकीय पक्षांनी घेतला आहे. संहितेचे उल्लंघन लक्षात घेऊन, प्रकाशन/प्रसारण करण्यास मनाई आहे, असे म्हटले होते.

व्हिडिओला आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे पत्र आयएएस अधिकारी डीपीएस खरबंदा यांनी आम आदमी पार्टीच्या तक्रारीनंतर लिहिले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की व्हिडिओ MCMC (मीडिया प्रमाणन आणि देखरेख समिती) च्या आदेशाच्या विरोधात आहे आणि आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्टपणे उल्लंघन करतो. सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवर या व्हिडिओचे प्रसारण ताबडतोब थांबवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत, असे त्यात म्हटे होते. पण, तासाभरानंतरच ही बंदी मागे घेण्यात आली.

राघव चड्ढांचा विश्वास यांच्यावर आरोप

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस करुणा राजू यांनी सांगितले की, हे पत्र त्यांच्या निदर्शनास येताच तात्काळ मागे घेण्यात आले. दुसरीकडे राघव चड्ढा यांच्या वतीने पत्रकार परिषदही घेण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी कुमार विश्वास यांनाच प्रश्न विचारले. राघव म्हणाले की, अरविंद केजरीवाल खलिस्तानी समर्थक असते, तर तुम्ही ही बाब सुरक्षा यंत्रणांना का नाही सांगितली? तुम्ही 2016 मध्येच पक्ष का सोडला नाही? राज्यसभेची खुर्ची मिळाली नाही, तर हा अपप्रचार सुरू केला. तुमचाही यात सहभाग आहे का? असे ते म्हणाले.
 

Web Title: Punjab Assembly Elections | Kumar Vishwas | Election Commission | Kumar Vishwas's video was first banned by the Election Commission, then allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.