पंजाबचा मुख्यमंत्री मी नव्हे, तर पंजाबीच असेल- अरविंद केजरीवाल
By admin | Published: January 11, 2017 03:53 PM2017-01-11T15:53:48+5:302017-01-11T15:53:48+5:30
पंजाबचा मुख्यमंत्री मी नव्हे, तर पंजाबीच व्यक्ती असेल, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पंजाबचा मुख्यमंत्री मी नव्हे, तर पंजाबीच व्यक्ती असेल, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केलं आहे. ते पतियाळामध्ये आपच्या सभेत बोलत होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी काल अरविंद केजरीवाल पंजाब राज्याचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे घोषित केले होते.
दरम्यान, त्यानंतर पंजाब आणि दिल्लीतल्या विरोधी पक्षांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला होता. अकाली दल आणि काँग्रेसनं अरविंद केजरीवाल हे नेहमीच मुख्यमंत्रिपदासाठी आसुसलेले असल्याची टीका केली आहे. अरविंद केजरीवालांनी हा खुलासा केला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, जर आम आदमी पार्टीला दिल्लीत विजय मिळाला तरी मी दिल्ली सोडून पंजाबचं मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी हा पंजाबी माणूस असेल. मनीष सिसोदियांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठीच विरोधक आम आदमी पार्टीला बदनाम करत आहेत. पंजाबच्या निवडणुकीत मतदार आम आदमी पार्टीला किती पसंत करतात ते दाखवून देतील. यावेळी त्यांनी पंजाबमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं आहे.