पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी "ऑपरेशन ब्ल्यू स्टार"चा उल्लेख करून मोदी सरकारला दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 10:36 AM2021-02-03T10:36:20+5:302021-02-03T10:38:34+5:30
Amarinder Singh Over Farmers Protest : अमरिंदर सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच दरम्यान पंजाबजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी (Amarinder Singh) मंगळवारी शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राला गंभीर इशारा देण्यात आला आहे. अमरिंदर सिंग यांनी 1984 च्या ऑपरेशन ब्लू स्टारचं (Operation Blue Star) उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरिंदर सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा उशीर हा 1984 ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेनं राज्याला ढकलून शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री बैठकीत काय म्हणाले याबाबतची माहिती पत्रकातून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. तसेच पाकिस्तानाकडून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला हा मुद्दा सोडवण्यासाठी काम करावं लागणार असल्याचं म्हटलं आहे.
"42 मागण्यांवरून दोन महिने चर्चा चालल्यानंतर पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली"
पंजाबमध्ये सीमेपलीकडून किती ड्रोन्स, शस्त्रास्त्र आणि स्फोटक तस्करीच्या मार्गाने आणण्यात आले आहेत याची आपल्याला माहिती असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं आहे. यासोबतच ऑपरेशन ब्लू स्टार होण्याआधी दोन चाललेल्या चर्चेची आठवणही अमरिंदर सिंग यांनी काढली. 42 मागण्यांवरून दोन महिने चर्चा चालल्यानंतर पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता की असंतोष धुसमत आहे. याचा स्फोट होईल याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत करून दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी रस्त्यावर करताहेत आंदोलन"https://t.co/CNu7gM7ALe#Congress#ModiGovt#FarmersProtest#Budget2021pic.twitter.com/Ofe7P0jUFO
— Lokmat (@MiLOKMAT) February 2, 2021
"खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं", पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन
प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आखून दिलेले मार्ग धुडकावत आंदोलक दिल्लीत घुसले. आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केलं होतं. अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं होतं. "दिल्लीत जे घडलं ते धक्कादायक दृश्य होतं. ट्रॅक्टर रॅली दरम्यान समाजकंटकांनी केलेली हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनाला आजच्या घटनेने छेद गेला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी हिंसक घटनेपासून दूर ठेवलं आहे. ट्रॅक्टर रॅली स्थगित करण्यात आली आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं" अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होत.
लाठ्याकाठ्या अन् दगडफेक; जीवघेण्या हल्ल्यात तीन कार्यकर्त्यांना लागली गोळीhttps://t.co/dhZSnf1NQq#Congress#AkaliDal#SukhbirSinghBadal
— Lokmat (@MiLOKMAT) February 2, 2021