केंद्रानं पाकिस्तानकडून ऑक्सिजच्या आयातीची मंजुरी दिली नाही: अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:58 AM2021-05-07T11:58:47+5:302021-05-07T12:03:18+5:30

Coronavirus Oxygen crisis : ऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं.

punjab cm amarinder singh said center wont allow import of oxygen from pakistan | केंद्रानं पाकिस्तानकडून ऑक्सिजच्या आयातीची मंजुरी दिली नाही: अमरिंदर सिंग

केंद्रानं पाकिस्तानकडून ऑक्सिजच्या आयातीची मंजुरी दिली नाही: अमरिंदर सिंग

Next
ठळक मुद्देऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. पंतप्रधानांकडे केली अतिरिक्त ऑस्किजन पुरवण्याची मागणी

पानीपत आणि बरोटीवाला येथून ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचं मत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी गुरुवारी व्यक्त केलं. "वाघा-अटारी सीमेवरुन पंजाबच्या स्थानिक उद्योगांना पाकिस्तानकडून ऑक्सिजनची व्यावसायिक आयात करण्यास परवानगी देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शविली आहे. पंजाबच्या आरोग्य सेवा प्रणालीवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल," असे ते म्हणाले. राज्यात सुमारे १० हजार रूग्ण ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली असल्याचं मत अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केलं. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी तातडीने ५० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे २० टँकरची मागणी केली आहे.

पर्यायी स्रोतांकडून पुरेसा पुरवठा होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. परंतु असं झाले नाही याबद्दल आपल्याला खेद आहे, असं ते म्हणाले. ऑक्सिजनची उपलब्धता नसल्यामुळे पंजाबमधील रुग्णालये बेड्सची संख्या वाढविण्यास असमर्थ असल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. सध्या पंजाब सरकार दररोज दोन रिकामे टॅकर एअरलिफ्ट करून रांची येथे नेत आहे. तसंच भरलेले टँकर रस्ते मार्गानं राज्यात आणले जात आहे. रांचीहून टँकर रस्ते मार्गानं पंजाबमध्ये पोहोचण्यास २ दिवसांचा कालावधी लागतो. पंजाबचा ऑक्सिजन कोटो १९५ मेट्रिक टनचा आहे. त्यापैकी ९० मेट्रिक टन बोकारो आणि १०५ मेट्रिक टन ऑक्सिजन हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांखंडमधून येत आहे. आपल्याला हिस्स्याच्या ऑक्सिजन आपल्याला मिळत नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title: punjab cm amarinder singh said center wont allow import of oxygen from pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.