असा निर्णय कोणीच घेतला नसेल! पंजाबचे मुख्यमंत्री थोड्याच वेळात ऐतिहातिक घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:36 PM2022-03-17T12:36:45+5:302022-03-17T12:39:22+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान थोड्याच वेळात महत्त्वाची घोषणा करणार
चंदिगढ: पंजाबच्या जनतेच्या हितासाठी आज एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली आहे. मान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंजाबच्या इतिहासात आतापर्यंत कोणीच असा निर्णय घेतलेला नसेल. काही वेळातच घोषणा करेन, असं मान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भगवंत मान यांनी कालच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. क्रांतीकारक भगतसिंग यांचं गाव असलेल्या खटकर कलां येथे शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. भगवंत मान पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री आहेत. मान यांनी दोनवेळा संगरुर लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व केलं आहे.
पंजाब की जनता के हित में आज एक बहुत बड़ा फ़ैसला लिया जाएगा। पंजाब के इतिहास में आज तक किसी ने ऐसा फैसला नहीं लिया होगा।
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 17, 2022
कुछ ही देर में एलान करूँगा...।
गेल्याच आठवड्यात पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आपनं ११७ पैकी ९२ जागा जिंकत पंजाबची सत्ता मिळवली. आपच्या झाडूनं जोरदार साफसफाई केल्यानं काँग्रेसच्या हातून पंजाबची सत्ता गेली. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ १८ जागांवर यश मिळालं. दिल्लीपाठोपाठ आपनं पंजाबमध्ये आपला सत्ता मिळाली आहे. यानंतर आता आपनं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.