Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, भाजप अन् ढिंडसा यांच्या पक्षासोबत लढणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:10 IST2021-12-06T15:03:48+5:302021-12-06T15:10:00+5:30
सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे, अमरिंदर सिंग हे ज्या भाजपवर गेल्या 25 वर्षांपर्यंत निशाणा साधत होते, आज त्यांनी त्यांच्यासोबतच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Punjab Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, भाजप अन् ढिंडसा यांच्या पक्षासोबत लढणार निवडणूक
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि अकाली दलाविरोधात बंड करणाऱ्या ढिंडसा यांच्या पक्षासोबत एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवेल, असे सिंग यांनी म्हटले आहे. ते चंदीगड येथे पत्रकारांशी बोलत होते. अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. याच बरोबर त्यांनी नव्या पक्षासोबत पंजाब विधानसभा निवडणुकीत उतरण्याचीही घोषणा केली होती.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रिय गृह मंत्री अमित शाह यांच्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही आता यासंदर्भात घोषणा केली आहे की, ते भाजपसोबत निवडणूक लढवतील. तसेच, सुखदेव सिंग ढिंडसा यांचा विचार करता, त्यांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले नाहीत.
सर्वात महत्वाची गोष्ठ म्हणजे, अमरिंदर सिंग हे ज्या भाजपवर गेल्या 25 वर्षांपर्यंत निशाणा साधत होते, आज त्यांनी त्यांच्यासोबतच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पक्षीय पातळीवर कोणतीही चर्चा झाली नसली तरी गृहमंत्री आणि पंतप्रधानांशी याबाबत बोलणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशा स्थितीत कॅप्टन आता भारतीय जनता पक्षाच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच अमरिंदर सिंग विजयाचा दावाही करत आहेत.