Punjab Election 2022: केजरीवाल आधी चूक करतात मग माफी मागतात, पंजाबमध्ये 200 कोटींचे होर्डिंग आले कुठून?, चरणजीत सिंग चन्नींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:43 PM2022-01-21T16:43:29+5:302022-01-21T16:45:37+5:30

Punjab Election 2022: राजकारणात काही शिष्टाचार असतात की नाही? अरविंद केजरीवाल यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे, असे चरणजीत सिंग चन्नी म्हणाले.

Punjab Election 2022: CM Charanjit Singh Channi Attack On AAP Leader Arvind Kejriwal | Punjab Election 2022: केजरीवाल आधी चूक करतात मग माफी मागतात, पंजाबमध्ये 200 कोटींचे होर्डिंग आले कुठून?, चरणजीत सिंग चन्नींचा सवाल

Punjab Election 2022: केजरीवाल आधी चूक करतात मग माफी मागतात, पंजाबमध्ये 200 कोटींचे होर्डिंग आले कुठून?, चरणजीत सिंग चन्नींचा सवाल

Next

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, चमकौर साहिबमधून (Chamkaur Sahib) निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी गुरु ग्रंथ साहिबचे अखंड पठण केले आहे. यावेळी चरणजीत सिंग चन्नी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा साधला आहे.  

चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, ही माझी चौथी निवडणूक आहे. अरविंद केजरीवाल यांना सांगेन की सीमा ओलांडू नका. त्यांनी आधी सीमा ओलांडली आहे आणि नंतर माफी मागितली आहे. गडकरी, जेटली, मजिठिया यांची माफी मागितली. राजकारणात काही शिष्टाचार असतात की नाही? अरविंद केजरीवाल यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे, असे ते म्हणाले.

याचबरोबर, केजरीवाल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी मी पार्टीकडे परवानगी मागितली आहे. होर्डिंग्ज लावायला माझ्याकडे पैसे नाहीत. पंजाबमध्ये केजरीवालांचे 200 कोटींचे होर्डिंग्ज लावले आहेत, प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती सुरू आहेत. हा पैसा येतो कुठून? गोव्यापासून उत्तराखंडपर्यंत केजरीवालांचे होर्डिंग्ज लावले आहेत, हा पैसा येतो कुठून? असे सवाल करत चरणजीत सिंग चन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पुढे म्हणाले की, जेव्हा मी त्यांना काळे इंग्रज म्हणालो, तेव्हा ते म्हणतात की, माझ्याशी संबंध ठेवायचे आहेत का? कोणाच्या तरी ठिकाणी पैसे पकडले. मला का ओढले जात आहे? माझ्या घरातून पैसे पकडले नाहीत, अन्यथा ईडीने माझ्या घरावर छापा टाकला असता. माझ्या घरात पैसे सापडले नाहीत. मला ओढणे योग्य नाही. हे सहन होत नाही. मला मानहानीचा खटला भरावा लागेल. मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजेक्ट केल्यानंतर, 3 महिने मुख्यमंत्री बनून बरेच काही साध्य केले, असे ईडीच्या छाप्याच्या प्रश्नावर चरणजीत सिंग चन्नी म्हणाले.

Web Title: Punjab Election 2022: CM Charanjit Singh Channi Attack On AAP Leader Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.