Punjab Election 2022: काँग्रेसच्या खासदार भाजपच्या कार्यक्रमात; म्हणाल्या, माझ्यासाठी कुटुंब आधी, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 06:54 AM2022-02-14T06:54:15+5:302022-02-14T06:54:32+5:30
अमरिंदर यांच्या विजयासाठी पत्नी परनीत यांची धडपड तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.
बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाबच्या पटियालातील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर या शिस्तभंगाच्या कारवाईची पर्वा न करता भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी कुटुंब अगोदर आहे आणि पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी मते मागण्यासाठी मी आले आहे. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर अमरिंदर सिंग हे पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून पंजाब लोक काँग्रेस या आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी खासदार परनीत कौर या भाजपाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत परनीत कौर यांनी लोकांना हात जोडून विनंती केली की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विजयी करा. यापूर्वी अमरिंदर सिंग यांच्या समर्थनार्थ केलेल्या एका विधानावरून परनीत कौर यांना पंजाबचे प्रभारी हरीश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, नोटीस पक्षाच्या सरचिटणीसांकडून यायला हवी.
भाजप दिल्लीतून सरकार चालवीत होते म्हणून अमरिंदर यांना हटविले -प्रियांका गांधी
अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. कोटकपुरा येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या. आम आदमी पार्टी प्रचार करीत असलेल्या शासनाच्या ‘दिल्ली मॉडेल’पासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करतांना त्या म्हणाल्या की, २०१४ मध्ये गुजरात मॉडेलचा प्रचार करून भाजप केंद्रात सत्तेत आली होती.
अमरिंदर सिंग यांंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्या म्हणाल्या की, आमचे पाच वर्षे येथे सरकार होते, हे खरे आहे. सरकारमध्ये काही उणीवा होत्या, हेही खरे आहे. हे सरकार आपल्या मार्गावरून भरकटले होते. दिल्लीतून काँग्रेसकडून नव्हेतर भाजप आणि भाजपप्रणीत सरकारमार्फत चालविले जात होते. हे लागेबांधे उघड झाले. त्यामुळे आम्हाला सरकार बदलावे लागले.
आम्ही तुमचे म्हणणे ऐकत होते. काही तरी चुकीचे होते, याची जाणीव होत होती