Punjab Election Result 2022: मनसे नेते म्हणाले, "प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:57 AM2022-03-10T11:57:33+5:302022-03-10T12:02:39+5:30

Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने  (AAP) मुसंडी मारली असून 64 हून अधिकजागांवर आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले आहे.

Punjab Election Result 2022: MNS leader Ameya Khopkar tweets on Punjab as AAP is leading on majority seats | Punjab Election Result 2022: मनसे नेते म्हणाले, "प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला"

Punjab Election Result 2022: मनसे नेते म्हणाले, "प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला"

googlenewsNext

मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने  (AAP) मुसंडी मारली असून 64 हून अधिकजागांवर आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले आहे. प्रस्थापितांना नाकरुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात, असेही अमेय खोपकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, पंजाब विधानसभा निवडणूक निकालात आम आदमी पार्टीने प्रस्थापितांना धक्का देत मोठे यश प्राप्त केले आहे. पंजाबमधील स्थानिक पक्षांना नाकारत, तसेच प्रस्थापितांविरोधात मतदान झाल्याचा कौल सुरुवातीच्या कलांमध्ये दिसून आला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँगेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तसेच शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल देखील पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 

एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार पंजाबमध्ये जितक्या जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यापेक्षा जास्त जागा आपला मिळत असल्याचे मतमोजणीच्या कलांमधून दिसून येत आहे. दरम्यान, अंतिम निकालानंतर पंजाबमधील राजकीय स्थिती स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या निकालांनी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज जे निकाल हाती आले आहेत, त्या निवडणुका आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखाली पंजाबमध्ये लढवल्या होत्या. 

आम आदमी पार्टी काय म्हणते?
दिवसही मोठा आहे कारण प्रकाशसिंग बादल लांबीमधून पिछाडीवर आहेत. आपल्या सामान्य माणसांचा पराभव होत आहे. नवज्योतसिंग सिद्धू पराभूत होत आहेत. म्हणूनच आजचा दिवस चर्चेचा आहे असे मला वाटते. पंजाब आता भगवंत मान चालवतील आणि आम आदमी पार्टीचे लोक चालवतील, असे आम आदमी पार्टीचे नेते संजीव झा म्हणाले. तर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, आम्ही अर्ध्या जागेवर लढलो, त्यामुळे हे होत आहे. आम्ही सर्व जागांवर लढलो असतो तर काहीतरी वेगळे झाले असते.
 

Web Title: Punjab Election Result 2022: MNS leader Ameya Khopkar tweets on Punjab as AAP is leading on majority seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.