याला म्हणतात नशीब! औषध खरेदीसाठी गेला अन् थेट शेतकरी करोडपतीच झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 10:53 IST2023-11-10T10:52:41+5:302023-11-10T10:53:20+5:30
एका वृद्ध शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे.

याला म्हणतात नशीब! औषध खरेदीसाठी गेला अन् थेट शेतकरी करोडपतीच झाला
पंजाबमधील माहिलपूर येथील एका वृद्ध शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. शेतकऱ्याने अडीच कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे. शेतकरी शीतल सिंह 4 नोव्हेंबर रोजी होशियारपूरला त्यांची औषधे घेण्यासाठी गेले होते आणि तिथे त्यांनी गमतीने लॉटरीचं तिकीट काढलं. नंतर जेव्हा लॉटरी तिकीट दुकानदार एसके अग्रवाल यांनी लॉटरी विजेत्यांची नावे जाहीर केली तेव्हा त्यांनी शीतल सिंह यांचेही नाव घेतले, ते विजेते होते.
शीतल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सांगितलं की आता त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वजण शुभेच्छा देत आहेत. शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तो होशियारपूर येथे औषध खरेदी करण्यासाठी आला होता आणि याच दरम्यान त्याने कोर्ट रोडवरील ग्रीन व्ह्यू पार्कच्या बाहेरील दुकानातून लॉटरी घेतली होती. काही तासांनंतर त्यांना कळलं की, ते विजेते आहेत आणि आता ते करोडपती देखील झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शीतल सिंह यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. या सर्वांचं लग्न झालं आहे. बक्षिसाच्या रकमेचा वापर कसा करायचा याविषयी कुटुंबियांशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लॉटरीची तिकिटं विकणाऱ्या एसके अग्रवाल यांचं खूप जुनं दुकान आहे.
दुकानदार एसके अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, हा ट्रेंड गेल्या दोन पिढ्यांपासून सुरू आहे आणि त्यांना याचा जास्त अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या इतर विजेत्यांबद्दलही सांगितलं. 2003 मध्ये 2 कोटी रुपयांचं तिकीट विकलं होतं आणि 2005 मध्ये त्यांच्या स्टॉलवरून 1 कोटी रुपयांचं दुसरं तिकीट विकलं गेलं होतं. प्रत्येकाचं नशीब असं चमकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.