राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस रवाना
By admin | Published: April 3, 2017 05:12 PM2017-04-03T17:12:30+5:302017-04-03T17:14:56+5:30
आयटम गर्ल राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - आयटम गर्ल राखी सावंतला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. सतत वादात असणा-या राखी सावंतविरोधात स्थानिक न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी रवाना झाले आहेत. भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 9 मार्च रोजी न्यायालयाने राखी सावंतला हजर राहण्याचा आदेश देऊनही हजर न राहिल्याने अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आला.
राखी सावंतने भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक होणार आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकी समाजाला अनुसरुन भगवान वाल्मिकींचा उल्लेख ‘मारेकरी’ म्हणून केला होता. तेव्हापासून राखीवर वाल्मिकी समाजाचा रोष ओढावला आहे. या घटनेनंतर राखीला न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही तिने न्यायालयात हजर न राहता न्यायव्यवस्थेचा एक प्रकारे अपमानच केला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण आता तिच्या अंगलगट येताना दिसत आहे.
राखी विरोधात तक्रार दाखल करणा-या अॅडव्होकेटनारिंदर आदिया यांनी म्हटले की, "आरोपी कितीही शक्तिशाली असला तरी, न्यायालयापासून स्वत:च बचाव करू शकणार नाही". आदिया यांना विश्वास आहे की, पोलीस राखीला न्यायालयात हजर करतील, तर वरिष्ठ वकील मलविंदर सिंह घुम्मन यांनी म्हटले की, "कायदा सगळ्यांसाठी समान असून, पोलीस त्यांचे काम करीत आहेत".