पंजाब पोलिसांची मोठी कारवाई!'ऑपरेशन अमृतपाल', खलिस्तान समर्थकांच्या अड्ड्यांवर छापे, राज्यात इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 03:52 PM2023-03-18T15:52:16+5:302023-03-18T15:53:25+5:30

पंजाबमधून एक मोठी मोठी बातमी समोर येत आहे.

punjab police hunt for amritpal singh sandhu arrest 6 ssociates raided multiple locations | पंजाब पोलिसांची मोठी कारवाई!'ऑपरेशन अमृतपाल', खलिस्तान समर्थकांच्या अड्ड्यांवर छापे, राज्यात इंटरनेट सेवा बंद

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई!'ऑपरेशन अमृतपाल', खलिस्तान समर्थकांच्या अड्ड्यांवर छापे, राज्यात इंटरनेट सेवा बंद

googlenewsNext

पंजाबमधून एक मोठी मोठी बातमी समोर येत आहे. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पकडण्यासाठी पंजाबपोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी अमृतपालच्या ठिकाणांवर घापे टाकले आहेत. यात ६ जणांना ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. अमृतपालच्या शोधासाठी पोलिसांनी ५ टीम तयार केल्या आहेत.

यासोबतच पंजाबमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. गिद्दरबहामध्ये एअरटेल, आयडिया आणि बीएसएनएलचे इंटरनेटही बंद आहे. संगरूर जिल्ह्यात इंटरनेट सेवाही बंद आहे. संगरूर हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा जिल्हा आहे. अमृतसर-जालंधर महामार्गावरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी 'वारीस पंजाब दे' मुखी अमृतपालच्या साथीदारांना जालंधर जिल्ह्यातील मेहतपूर पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले आहे.

Imran Khan Pakistan: इम्रान खान इस्लामाबादला निघताच दरवाजा तोडून घरात घुसले पंजाब पोलीस

बर्नाळा जिल्ह्यात मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण पंजाबमध्ये रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या कारचा पाठलाग केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अमृतपाल सिंग घटनास्थळावरून फरार झाला असण्याचे बोलले जात आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पंजाब पोलिसांनी लोकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आणि राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला अमृतपाल सिंगच्या जवळच्या साथीदाराला अमृतसर विमानतळावर देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती. गुरिंदरपाल सिंग औजला यांना श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. औजला इंग्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. तो लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान पकडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी पोलिसांना दिली होती.

Web Title: punjab police hunt for amritpal singh sandhu arrest 6 ssociates raided multiple locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.