Deep Sidhu Death : 22 टायर ट्रकला धडकली दीप सिद्धूची स्कॉर्पिओ; NRI मैत्रिणीनं सांगितलं 'त्या'वेळी नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:16 AM2022-02-16T09:16:32+5:302022-02-16T09:16:58+5:30
अपघात झाला तेव्हा अभिनेता दीप सिद्धूची एक मैत्रिण त्याच्या सोबत होती. सध्या ती रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत असून दीप सिद्धूच्या मित्रिणीकडेही विचारपूस करत आहेत.
पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत एक मैत्रिणही होती. सध्या ती रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत असून दीप सिद्धूच्या मित्रिणीकडेही विचारपूस करत आहेत.
पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू याचा काल रात्री रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर कारमध्ये त्याच्यासोबत बसलेली एनआरआय मैत्रिण रीना राय जखमी झाली आहे. दीप सिद्धू दिल्लीहून भटिंडाकडे जात असताना, हरियाणातील वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर खरखोडाजवळ हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपच्या एनआरआय मैत्रिणीने सांगितले की, अपघात झाला तेव्हा त्याचा डोळा लागला होता. अपघात एवढा भीषण होता की, दीप सिद्धूची कार सुमारे 20 ते 30 मीटरपर्यंत फरफटत गेली. या अपघातात स्कॉर्पिओच्या पुढच्या भागाचा पार चकनाचूर झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाता वेळी 22 टायर ट्रक रस्त्याच्या कडेला उभा नव्हता, तर केएमपीवर धावत होता. मागून भरधाव वेगाने येणारी ही स्कॉर्पिओ 22 टायर ट्रॉलीला धडकली.
रीना रायणे फोनवरून दिली महिती -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धूसोबत असलेल्या रीना रायने अपघातानंतर तिच्या काही ओळखीच्या लोकांना फोन केले. दरम्यान केएमपीवर असलेली रुग्णवाहिका आणि काही लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर दीप सिद्धूला रुग्णालयात नेण्यात आले. ट्रक चालक सध्या फरार आहे.