पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती
By admin | Published: June 1, 2015 10:12 PM2015-06-01T22:12:31+5:302015-06-02T16:17:50+5:30
मिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९० वी जयंती येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. श्री राजा विरभद्र मंदिरात विरभद्र मंदिराचे सेवेकरी सिताराम भगत यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
मिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९० वी जयंती येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. श्री राजा विरभद्र मंदिरात विरभद्र मंदिराचे सेवेकरी सिताराम भगत यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
सायंकाळी अहिल्यादेवीच्या प्रतिमेची धनगर समाजाचे पारंपारिक वाद्य डफाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी पिवळे फेटे बांधले होते. यात ग्रामस्थही सहभागी झाले होते. रात्री ह. भ. प. सुकळीकर महाराज यांचे कीर्तन झाले. राजे प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. रमेश डफळ यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आत्माराम झाडे, डॉ. बबनराव नरसाळे, बाळासाहेब शेळके, खलूभाई पटेल, बापू मिरपगार उपस्थित होते.
मिरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य फुंदे यांची बढती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. तसेच नव्याने हजर झालेले प्राचार्य बी. बी. ससे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य पी. ई. नरवडे, डॉ. नरसाळे, बापू मिरपगार, विठ्ठल गवळी, अण्णासाहेब शिंदे, रमेश डफळ, बाळासाहेब शेळके, आत्माराम झाडे आदी उपस्थित होते. प्राचार्य ससे यांनी विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करू, असे सांगून ग्रामस्थांनी विद्यालयास सहकार्य करण्याचे आवाहन केले.