४ लाख ७४ हजार क्विंटल कापसाची खरेदी

By Admin | Published: January 23, 2015 11:06 PM2015-01-23T23:06:28+5:302015-01-24T00:18:32+5:30

नांदेड- जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रामार्फत २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ७४ हजार ४७० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा सीसीआयही कापूस खरेदीत आघाडीवर असल्याचे दिसते.

Purchase of 4 lakh 74 thousand quintals of cotton | ४ लाख ७४ हजार क्विंटल कापसाची खरेदी

४ लाख ७४ हजार क्विंटल कापसाची खरेदी

googlenewsNext

नांदेड- जिल्ह्यातील विविध खरेदी केंद्रामार्फत २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ७४ हजार ४७० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यंदा सीसीआयही कापूस खरेदीत आघाडीवर असल्याचे दिसते.
जिल्ह्यात कापूस पणन महासंघामार्फत किनवट येथे ९१३३ क्विंटल, भोकर ४२३६ क्विंटल तर धर्माबाद येथे २४ क्विंटल कापसाची सीसीआयची खरेदी केली आहे. तर खाजगी व्यापार्‍यांनी २ लाख ३२ हजार ३५९ क्विंटलची तसेच सीसीआयमार्फत २ लाख २८ हजार ७१८ क्विंटलची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकर्‍यांनी सीसीआयलाही कापूस देण्यासाठी पसंती दिल्याने सीसीआयही आघाडीवर दिसते. शासनाची विविध भागात खरेदी केंद्रे सुरु करुनही खाजगी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या दारापुढे वाहने नेत थेट खरेदी सुरु केली आहे. शिवाय पैसेही रोख देत असल्याने त्यांच्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे.सध्या सीसीआय ३९०० ते ३९५० रुपयेतर खाजगी व्यापारी ३७०० ते ३८०० रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत.
सीसीआयमार्फत चालू बाजारभावाने तर कापासून पणन महासंघ शासनाच्या हमीभावाने खरेदी करते. तर खाजगी व्यापारी हे बाजारातील चालू दर पाहूणच खरेदी करतात.
शासनाचा हमीभाव उत्पादन खर्चावर आधारित चांगला असल्यास बाजारातील कापसाचे भाव टिकून राहण्यास मदत होते. गतवर्षी कापसाला सरासरी ४४०० ते ४७५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.
खाजगी व्यापारी शेतकर्‍यांना रोख स्वरुपात रक्कम जागेवरच दिली जाते. तर कापूस पणन महासंघामार्फत कापूस विक्री केल्यास बँक ऑफ इंडियाचा धनादेश दिला जातो. बँक ऑफ इंडियाच्या शाखा तीन ते चारच असल्याने चार-चार आठवडे धनादेश वटण्यास विलंब लागतो. सीसीआयमार्फत खरेदीच्या सात दिवसानंतर शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते.शिवाय शेतकर्‍यांना स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था करुन कापूस सीसीआयच्या खरेदी केंद्रावर आणावा लागतो. यामुळे दिवसेंदिवस शेतकरी कापूस पणन महासंघाकडून दूर जात असला तरी यावर्षी मात्र शेतकर्‍यांना सीसीआयला खाजगी व्यापार्‍याच्या बरोबरीत पसंती दिल्याचे चित्र आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील वेेगवेगळ्या १२ खाजगी कापूस खरेदी केंद्रावर डिसेबंरअखेर ३ लाख ८६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. खाजगी खरेदी केंद्रावर एकूण ३ लाख ५० हजार ६५८ क्विंटल खरेदी झाली आहे. तर सीसीआयमार्फत विविध खरेदी केंद्रावर ३२४१९ क्विंटल अशी एकूण ३ लाख ८३ हजार ७७ क्विंटल एवढी खरेदी झाली होती.

Web Title: Purchase of 4 lakh 74 thousand quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.