रेल्वे स्थानकात मिळणार स्वस्तामध्ये शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:49 AM2017-07-24T00:49:57+5:302017-07-24T00:49:57+5:30
भारतीय रेल्वेची ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) ही कंपनी येत्या वर्षभरात देशभरातील ४५० रेल्वे स्थानकांमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) ही कंपनी येत्या वर्षभरात देशभरातील ४५० रेल्वे स्थानकांमध्ये स्वस्तात शुद्ध पाणी विकण्याची ११०० यंत्रे सुरु करणार आहे. येथे एक रुपयाला एक ग्लास पाणी मिळेल.
सध्या ३४५ रेल्वे स्थानकांवर अशी पाणी विकण्याची १,१०६ यंत्रे आहेत. नव्या स्टॉल्समुळे प्रवाशांना दिवसाचे २४ तास शुद्ध पाणी मिळेल व सुमारे दोन हजार नवे रोजगारही उपलब्ध होतील. या यंत्राव्दारे एक रुपयात ३०० मिली पाणी मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, या माध्यमातून स्वस्तात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्वस्तात स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये यंत्रातून पाणी देण्याची योजना सुरु करण्यात आली. यात रिव्हर्स ओसमोसिस (आरओ) पद्धतीने शुद्ध पाणी मिळते. ही यंत्रे स्वयंचलित आहेत.