दलित महिला बसली म्हणून खुर्चीचे शुध्दीकरण
By admin | Published: February 5, 2016 01:39 PM2016-02-05T13:39:47+5:302016-02-05T13:52:05+5:30
कानपूरमधल्या देहात जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकानेच असे जातीपात, भेदभावाला खतपाणी घालणारे वर्तन केल्याचे समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. ५ - मुलांना समानतेची, सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. पण जेव्हा शिक्षकच आपल्या कृतीतून जात-पात, भेदभावाला खतपाणी घालणारे वर्तन करत असेल तर, विद्यार्थ्यांनी कुठला आदर्श घ्यायचा.
कानपूरमधल्या देहात जिल्ह्यात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकानेच असे जातपात, भेदभावाला खतपाणी घालणारे वर्तन केल्याचे समोर आले आहे. वीरसिंहपूर गावच्या महिला दलित प्रधान पप्पी देवी या गावातील शाळेत दिल्या जाणा-या मिड डे मिल बद्दल तक्रार घेऊन शाळेत गेल्या होत्या.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष शर्मा यांनी पप्पी देवींना फक्त अपमानास्पद वागणूकच दिली नाही तर, विद्यार्थी आणि कर्मचा-यांकडून पप्पी देवी ज्या खुर्चीवर बसल्या होत्या त्या खुर्चीचे पाण्याने धुऊन शुध्दीकरण करुन घेतले. यासंबंधी पप्पी देवी यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यांतर प्रशासनाने तहसीलदाराला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.