मांझी यांच्या भेटीनंतर मंदिराचे शुद्धीकरण

By admin | Published: September 30, 2014 01:55 AM2014-09-30T01:55:46+5:302014-09-30T03:32:28+5:30

देवदर्शन करून मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तेथील पुजा:याने मंदिर परिसर आणि गाभा:यातील देवाची मूर्ती धुऊन तिचे शुद्धीकरण केले होते, असा दावा बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केला आहे.

Purification of the temple after meeting Manjhi | मांझी यांच्या भेटीनंतर मंदिराचे शुद्धीकरण

मांझी यांच्या भेटीनंतर मंदिराचे शुद्धीकरण

Next
>पाटणा : देशात दलितांना आजही भेदभाव सहन करावा लागतो. आपण मधुबनी जिल्ह्यातील एका मंदिरात गेलो होतो. देवदर्शन करून मंदिरातून बाहेर पडल्यानंतर तेथील पुजा:याने मंदिर परिसर आणि गाभा:यातील देवाची मूर्ती धुऊन तिचे शुद्धीकरण केले होते, असा दावा बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केला आहे. मांझी यांच्या भेटीनंतर मंदिर व देवाच्या मूर्तीचे शुद्धीकरण करण्याचा हा प्रकार अतिशय लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. मांझी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करून दोषींना अटक करण्यास का सांगितले नाही, असा सवालही पासवान यांनी केला.
दलित, महादलित आणि समाजातील मागास समजल्या जाणा:या वर्गातील लोकांप्रती आजही जातीयता आणि भेदभाव पाळला जातो. मी स्वत: या जातीवादाचा बळी ठरलो आहे, असे मांझी म्हणाले. माजी मुख्यमंत्री भोला पासवान शास्त्री यांच्या जन्मशताब्दी समारंभात मांझी बोलत होते. ‘मागच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या काळात मधुबनी जिल्ह्यातील ज्या मंदिरात मी गेलो ते मंदिर व तेथील देवाची मूर्ती मी बाहेर पडल्यानंतर धुऊन तिचे शुद्धीकरण करण्यात आले होते. ही घटना मला ठाऊक नव्हती. खाण आणि भूगर्भशास्त्रमंत्री राम लक्ष्मण राम रमन यांनी ही घटना मला सांगितली. उच्च जातीचे लोक आपले काही काम घेऊन येतात तेव्हा मी कोणत्या पाश्र्वभूमीतून आलो हे ठाऊक असतानाही माङया पाया पडतात,’ असे मांझी म्हणाले.
दलितांबद्दलचा हा जातीयवाद व भेदभाव शासकीय यंत्रणोतही पाहायला मिळतो. दुर्बल घटकांच्या कल्याणाशी संबंधित काही काम करतो म्हटले की, याच मानसिकतेचा अडसर निर्माण होतो, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
 
 
 

Web Title: Purification of the temple after meeting Manjhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.