दादरीसारख्या घटनांनी भाजपाच्या प्रतिमेला धक्का - पर्रीकर
By admin | Published: October 12, 2015 01:11 PM2015-10-12T13:11:14+5:302015-10-12T13:11:14+5:30
दादरीसारख्या घटनांनी भाजपाप्रणीत एनडीए सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो आणि पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाचेही नुकसान होते असे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १२ - दादरीसारख्या घटनांनी भाजपाप्रणीत एनडीए सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो आणि पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाचेही नुकसान होते असे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडले आहे. दादरीतील घटनेमागे संघाचा हात नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
उत्तरप्रदेशमधील दादरी येथे गोमांच्या खाल्ल्याच्या संशयावरुन एका मुस्लिम व्यक्तीची जमावाने हत्या केली होती. या घटनेविषयी रविवारी पणजीतील एका कार्यक्रमात पर्रीकर यांनी त्यांचे मत मांडले. या घटनेमागे संघाचा हात आहे का असा प्रश्न विचारला असता पर्रीकर म्हणाले, मी लहानपणापासून संघाचा पदाधिकारी होतो. दादरीतील घटनेमागे संघाचा हात नाही. कोणत्याही प्रकारची हिंसा अस्वीकाहार्य आहे असेही त्यांनी सांगितले. अशा घटनांच्या वेळी सर्वांनीच संयम बाळगावे असे आवाहन त्यांनी केले.