रेल्वेचा प्रवाशांना धक्का, तत्काळ तिकीट दरांत वाढ

By admin | Published: December 24, 2015 08:32 AM2015-12-24T08:32:39+5:302015-12-24T08:45:35+5:30

भारतीय रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापून त्यांना पुन्हा एकदा धक्का देत रेल्वेचे तत्काळ तिकीट दर २५ ते १०० रुपये वाढवले आहे.

Pushing rail passengers, increase in immediate ticket rates | रेल्वेचा प्रवाशांना धक्का, तत्काळ तिकीट दरांत वाढ

रेल्वेचा प्रवाशांना धक्का, तत्काळ तिकीट दरांत वाढ

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - - भारतीय रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापून त्यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. तोट्याचा भार कमी करण्यासाठी रेल्वेकडून विविध मार्गाने महसूल वाढवला जात असून आता रेल्वेच्या तत्काळ तिकीट दरांत वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत तत्काळ आरक्षणाचे दर २५ ते १०० रुपयांपर्यंत वाढणार असून २५ डिसेंबर पासून ही वाढ लागू होणार आहे. 
या नव्या दरवाढीमुळे स्लीपरच्या तत्काळ तिकिटासाठी १७५ रूपयांऐवजी २०० रुपये रावे लागलतील तर स्लीपर क्लास तिकिटाचे कमीत कमी तात्काळ शुल्क ९० रुपयांवरून १००रुपये करण्यात आले आहे. मात्र सेकंड क्लास तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवासांना यामधून सूट देण्यात आली आहे. 
 
तात्काळ दरवाढ 
स्लीपर - किमान दर ९० वरून १०० रुपये, कमाल दर १७५ वरुन २०० रुपये
एसी चेअरकार - किमान दर १०० वरुन १२५, तर कमाल दर २०० वरून २२५ रुपये
एसी थ्री टायर - किमान तात्काळदर २५० वरून ३०० रुपये करण्यात आले. तर कमाल दर ३५० वरून ४०० रुपये
एसी टू टायर - किमान तात्काळ दर ३०० वरून ४०० , तर कमाल दर ४०० वरुन ५०० रुपये
एक्झिक्युटिव्ह क्लास - किमान तात्काळ दर ३०० वरुन ४०० रुपये, तर कमाल दर ४०० वरून ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येतील.
 
 किमान आरक्षण दर :
 
     श्रेणी         जुने दर    नवे दर
सेकंड क्लास     १०          १०
 
स्लीपर क्लास    ९०        १००
 
एसी चेअर         १००       १२५
 
एसी थ्री टायर    २५०        ३००
 
एसी टू टायर      ३००       ४००

Web Title: Pushing rail passengers, increase in immediate ticket rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.