पुष्पा चित्रपटातील एका गाण्याने बदललं नशीब; इलेक्ट्रिशियनच्या लेकाला थेट बॉलिवूडमधून फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:36 PM2023-04-10T17:36:15+5:302023-04-10T17:38:15+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेला गायक चंद्रशेखरच्या आयुष्यात सोनू सूद आता देवदूताच्या रुपात आला आहे. त्याने गायकाला मोठी ऑफर दिली आहे.
बिहारमध्ये असे अनेक तरुण आहेत जे आपल्या कलेच्या जोरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरदूरपर्यंत पोहोचू शकले आहेत. आता या यादीत बेगुसराय जिल्हा भगवानपूर येथील रहिवासी चंद्रशेखर मिश्रा याचेही नाव जोडले गेले आहे. पुष्पा या चित्रपटातील चंद्रशेखरने गायलेले गाणे व्हायरल झाले आहे. सोनू सूदच्या टीमनेही हे व्हायरल गाणे ऐकले आणि त्यानंतर सोनू सूदला भेटण्याचे आमंत्रण मिळाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला गायक चंद्रशेखरच्या आयुष्यात सोनू सूद आता देवदूताच्या रुपात आला आहे. त्याने गायकाला मोठी ऑफर दिली आहे.
4 जानेवारी 2022 रोजी, साऊथ इंडियन फिल्म पुष्पा मधील श्रीवल्ली हे गाणे जावेद अलीच्या आवाजात प्रदर्शित झाले. हे गाणे गाऊन बेगुसरायचा व्हायरल बॉय चंद्रशेखर मिश्रा ही प्रसिद्धीच्या झोतात आला. चंद्रशेखरचे हे गाणे व्हायरल झाल्यानंतर आता त्याला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा फोन आला असून सोनूने चंद्रशेखरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चंद्रशेखरने काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
चंद्रशेखरने सांगितले की, 15 वर्षांपूर्वी गावातच आजोबांसोबत गाणे गायला सुरू केले होते. गेली पाच वर्षे तो मोबाईलवर गाणी म्हणत आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असे. आता हे गाणे व्हायरल झाले आहे. चंद्रशेखरने याआधी दोन अल्बममध्येही गाणी गायली आहेत. पण त्याला कोणतीही ओळख मिळाली नाही. गायिका नेहा सिंग राठोड यांनी चंद्रशेखरला जेव्हा सोनू सूदने मुंबईला बोलावल्याचे सांगितले तेव्हा त्याला खूप आनंद झाला.
चंद्रशेखर मिश्रा यांचे वडील कृष्ण कुमार मिश्रा हे इलेक्ट्रिशियन आहेत. स्थानिक महंत प्रणव भारती राय यांनी सांगितले की त्यांनी चंद्रशेखरला यापूर्वीही आर्थिक मदत केली आहे आणि आता गावाचे नाव उज्वल होईल याचा आनंद आहे. चंद्रशेखरने सांगितले की सोनू सूदचा कार्यक्रम 9 एप्रिल रोजी पूर्णिया येथे होणार होता, परंतु आता तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यानंतर सोनूने त्याला मुंबईत येण्यास सांगितले आहे. चंद्रशेखरची आई गृहिणी आहे. याशिवाय तो पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. गावात राहिल्यामुळे त्याला फारशी संधी मिळू शकली नाही. पण तरीही ते प्रयत्न करत राहिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"