...अधिका-यांनो मुलांना इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत घाला
By admin | Published: July 25, 2016 06:17 PM2016-07-25T18:17:53+5:302016-07-25T18:17:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता भारतानं पाकिस्तानातील भारतीय राजनैतिक अधिका-यांना मुलांना इस्लामाबादमधील शाळेच्या बाहेर हलवण्याच्या सूचना केल्या आहेत. पाकिस्तानातील राजनैतिक अधिका-यांनी मुलांना भारतात परत पाठवावे अथवा इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत टाकावे. पाकिस्तानात शिकत असलेल्या भारतीय मुलांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये जवळपास 50 भारतीय मुलं इस्लामाबादमधील अमेरिकन शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्या सगळ्या मुलांना इस्लामाबादच्या बाहेरच्या शाळेत टाका अथवा त्यांना भारतात परत पाठवा, असा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आहे.
दहशतवादी बु-हान वाणी याच्या हत्येनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद उफाळून आला आहे. अनेक पाकिस्तानी नेते काश्मीरमधली परिस्थिती चिघळवण्यासाठी बेमालूम वक्तव्ये करत सुटले आहे. पाकिस्ताननं बु-हान वाणीच्या खात्मानंतर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी काळा दिवसही पाळला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारतीय राजनैतिक अधिका-यांच्या मुलांसोबत दगाफटका करण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.