Electricity: घरात लावा ही स्मार्ट लाईट, मिळेल फ्री वीज, कितीही वापर केला तरी येणार नाही बिल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 06:10 PM2022-12-22T18:10:45+5:302022-12-22T18:11:10+5:30
Electricity: ही लाईट एवढी किफायतशीर आहे की, तिला खरेदी करणे कुणासाठीही अगदी सोपे आहे. जर तुम्ही याबाबत माहिती घेण्यास इच्छुक असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देणार आहोत.
बाजारामध्ये वैशिष्ट्यपूर्ण विजेची उपकरणं आली आहेत. या उपकरणांचा वापर केल्यास विजेचं बिलच येणार नाही. ही लाईट खूप खास आहे, तसेच ती ऑटोमेटिकसुद्धा आहे. म्हणजेच त्याला चालू बंद करण्यासाठी बटण दाबण्याची गरज भासणार नाही. ही लायटिंग एवढी स्मार्ट आहे की खोलीत कुणी आल्यावर ती आपोआप सुरू होते. ही लाईट एवढी किफायतशीर आहे की, तिला खरेदी करणे कुणासाठीही अगदी सोपे आहे. जर तुम्ही याबाबत माहिती घेण्यास इच्छुक असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देणार आहोत.
आपण ज्या लाईटबाबत बोलत आहोत ती लाईट मोशन सेन्सरसोबत येते. तसेच कुठलीही व्यक्ती जेव्हा आसपास येते तेव्हा त्याला डिटेक्ट करते आणि सुरू होते. आतापर्यंत तुम्ही या लाईटबाबत क्वचितच ऐकलं असेल.
या लायटिंगमध्ये तुम्हाला मोशन सेंसरसोबत एक दमदार बॅटरी आणि एक सोलर पॅनेल मिळतो. त्यामुळे ही लाईट सहजपणे चार्ज होते. ही लायटिंग जर तुम्ही घराच्या छतावर लावली तर तुम्हाला त्या फ्लोअरवर लाईट पेटवण्यासाठी तुम्हाला विजेचं बिल द्यावं लागणार नाही. या लाईटचा प्रकाश एवढा प्रखर असतो की त्यामुळे तुम्हाला खोलीत अन्य लाईट लावण्याची गरज भासत नाही. तसेच या लाईटच्या वापरामुळे विजबिलही येत नाही. या लायटिंगची किंमत केवळ ३९९ रुपये एवढी किफायतशीर आहे.