पुत्तींगल आग दुर्घटना प्रकरण - ४१ आरोपींना जामीन

By admin | Published: July 11, 2016 08:26 PM2016-07-11T20:26:39+5:302016-07-11T20:26:39+5:30

कोल्लम येथील पुत्तींगल मंदिरातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी ४१ आरोपींना सोमवारी जामीन देण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या दुर्घटनेत १०० लोकांचा बळी जाण्यासह ३८० लोक जखमी झाले होते.

Puthigal Fire Accident Case - 41 accused in bail | पुत्तींगल आग दुर्घटना प्रकरण - ४१ आरोपींना जामीन

पुत्तींगल आग दुर्घटना प्रकरण - ४१ आरोपींना जामीन

Next

ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. ११ -  कोल्लम येथील पुत्तींगल मंदिरातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी ४१ आरोपींना सोमवारी जामीन देण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या दुर्घटनेत १०० लोकांचा बळी जाण्यासह ३८० लोक जखमी झाले होते.
विनापरवाना व निष्काळजीपणे करण्यात आलेल्या आतषबाजीने पुत्तींगल मंदिरात आग लागली होती. शोभेच्या दारूचे स्फोट होऊन मंदिर आणि आसपासच्या इमारतींचे छताचे काँक्रीट व प्लास्टर कोसळून काही लोक जागीच ठार, तर इतर अनेक जखमी झाले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी दोन महिने कोठडीत होते. मे महिन्यात न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन नाकारला होता. केरळमध्ये कोणत्याही धार्मिक उत्सवात आतषबाजी आणि हत्तींच्या प्रदर्शनाचा सोस वाढल्याची टिपणीही न्यायालयाने केली होती.

Web Title: Puthigal Fire Accident Case - 41 accused in bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.