आयएनएसचे नवे अध्यक्ष पी.व्ही. चंद्रन
By admin | Published: September 19, 2015 02:41 AM2015-09-19T02:41:02+5:302015-09-19T02:41:02+5:30
मातृभूमी समूहाचे पी.व्ही. चंद्रन यांची २०१५-१६ या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयएनएसच्या ७६व्या वार्षिक
बेंगळुरू : मातृभूमी समूहाचे पी.व्ही. चंद्रन यांची २०१५-१६ या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयएनएसच्या ७६व्या वार्षिक बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांनी संभव मेट्रोचे किरण बी. वडोदरिया यांची जागा घेतली. चंद्रन हे मातृभूमी समूहाच्या ‘गृहलक्ष्मी’ या महिलांच्या मासिकाचे व्यवस्थापकीय संपादक आणि पूर्णकालीन संचालक आहेत.
सोमेश शर्मा (राष्ट्रदूत) डेप्युटी प्रेसिडेंट, अकिला उराणकर (बिझिनेस स्टँडर्ड) व्हाईस प्रेसिडेंट तर मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स) यांची मानद कोषाध्यक्षपदी निवड झाली. व्ही. शंकरन हे सरचिटणीस आहेत.
कार्यकारिणीचे ४१ सदस्य - एल. आदिमूलन (हेल्थ अॅण्ड अॅन्टिसेप्टिक), एस. बालसुब्रमण्यम आदित्यन (डेली थांथी), पवन अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), समाहित बाल (प्रगतीवादी), के. बालाजी (द हिंदू वीकली), व्ही.के. चोप्रा (दैनिक आसाम), विजयकुमार चोप्रा (पंजाबी केसरी, जालंधर), विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत), जगजितसिंग दर्दी (चर्हदिकला डेली), विवेक गोयंका (द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्रमोहन गुप्ता (दैनिक जागरण), प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण, वाराणशी), शैलेश गुप्ता (मीड-डे), राजकुमार जैन (नवभारत टाइम्स), सी.एच. किरण (विपुल आणि अन्नदाता), डॉ. आर. लक्ष्मीपती (दीनमल्हार), राजूल माहेश्वरी (अमर उजाला), जयंत मॅमेन मॅथ्यू (मल्याळम् मनोरमा), विलास मराठे (दैनिक हिंदुस्तान, अमरावती), नरेश मोहन (संडे स्टेटस्मन), अनंत नाथ (गृहशोभिका, मराठी), डी.डी. पूरकायस्थ (आनंद बाजार पत्रिका), आर.एम.आर. रमेश (दिनकरन), के. राजा प्रसाद रेड्डी (साक्षी, विशाखापट्टणम्), इंद्राणी रॉय (आऊटलूक), राकेश शर्मा (आज समाज), मनोजकुमार सोनथालिया (द न्यू इंडियन एक्स्प्रेस), किरण डी. ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), वेंकटेश (हिंदुस्तान टाइम्स), विनय वर्मा (द ट्रिब्यून), प्रताप पवार (सकाळ), एम.पी. वीरेंद्रकुमार (मातृभूमी), जेकब मॅथ्यू (वनिता), बाहुबली एस. शहा (गुजरात समाचार), होरमुसजी एन. कामा (बॉम्बे समाचार वीकली), कुंदन आर. व्यास (व्यापार, मुंबई), आशिष बग्गा (इंडिया टुडे), के.एन. तिलककुमार (डेक्कन हेराल्ड, प्रजावाणी), रवींद्रकुमार (द स्टेटस्मन), किरण वडोदरिया (संभव मेट्रो).