जेव्हा २० फूटाचा अजगर हावडा-मुंबई एक्सप्रेसच्यासमोर रेल्वे रुळावर येतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 07:43 PM2020-01-04T19:43:34+5:302020-01-04T19:44:08+5:30
दुसऱ्या एका ट्रेनच्या क्रॉसिंगमुळे हावडा-मुंबई एक्स्प्रेस टिकारिया रेल्वे स्थानकावर थांबली होती.
चित्रकूट - अजगर कधी ट्रेन थांबवू शकतो? हे ऐकून थोडेसे विचित्र वाटतील, परंतु हे सत्य आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील माणिकपूरहून सतनाकडे जाणाऱ्या हावडा-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनला टिकारिया रेल्वे स्थानकासमोर अजनगराने सुमारे 10 मिनिटे थांबवले.
पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर प्रादेशिक अधिकारी मृत्युंजय कुमार यांनी शनिवारी सांगितले की, 'माणिकपूरहून सतनाकडे जाणारी हावडा-मुंबई एक्सप्रेससमोर शुक्रवारी सकाळी टिकारिया रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर अचानक मोठा अजगर आला. त्यामुळे सुमारे 10 मिनिटे रेल्वेची वाहतूक थांबवावी लागली.
२० फूटाचा होता अजगर
कुमार यांनी सांगितले की, “दुसऱ्या एका ट्रेनच्या क्रॉसिंगमुळे हावडा-मुंबई एक्स्प्रेस टिकारिया रेल्वे स्थानकावर थांबली होती. जेव्हा रेल्वे रुळ फ्री झाला त्यावेळी ही गाडी सतनाकडे निघाली, तेव्हा अचानक सुमारे 20 फूट लांब अजगर रुळावर आला. हे पाहिल्यावर ड्रायव्हरने इमरजेंसी ब्रेक लावून गाडी थांबवली आणि सुमारे 10 मिनिटे या अजगराला सुखरुप बाहेर काढल्यानंतर एक्सप्रेस मार्गस्थ झाली.