उ. प्र. काँग्रेसची धुरा राज बब्बर यांच्याकडे

By admin | Published: July 13, 2016 02:49 AM2016-07-13T02:49:45+5:302016-07-13T02:49:45+5:30

विधानसभा निवडणूक होणार असलेल्या उत्तर प्रदेशात राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेता व खासदार राज बब्बर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

A. Q. The Congress axis of Raj Babbar | उ. प्र. काँग्रेसची धुरा राज बब्बर यांच्याकडे

उ. प्र. काँग्रेसची धुरा राज बब्बर यांच्याकडे

Next

नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक होणार असलेल्या उत्तर प्रदेशात राज्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेता व खासदार राज बब्बर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी ही माहिती दिली. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात प्रचार करणार का? या प्रश्नाचे थट उत्तर न देता, आझाद म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये प्रत्येक जण ठरावीक भूमिका बजावत असतो व यापुढेही तेच कायम राहील. आग्रा येथे जन्मलेले राज बब्बर त्या राज्यातून तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले. सध्या ते उत्तराखंडमधून राज्यसभा सदस्य आहेत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: A. Q. The Congress axis of Raj Babbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.