Qatar Airways: दिल्लीहून दोह्याला जाणारे विमान कराचीला उतरविले; चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 11:31 AM2022-03-21T11:31:22+5:302022-03-21T11:33:40+5:30
Qatar Airways emergency Landing: कतर एअरवेजच्या या विमानात १०० प्रवासी होते. हे विमान QR579 आहे. दिल्लीहून पहाटे 3.50 मिनिटांनी ते दोह्याला निघाले होते.
दिल्लीहून दोह्याला जाणारे विमान कराचीमध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे उतरविण्यात आले आहे. कतर एअरवेजचे हे विमान होते. सध्या कराचीहून प्रवाशांना दुसऱ्या विमानाद्वारे पुढे पाठविण्याचे काम सुरु आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार फ्लाईटच्या कार्गोमधून धुर निघू लागला, हे समजल्याने विमानाला जवळचा विमानतळ कराची असल्याने तिकडे वळविण्यात आले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
#UPATE | The incident is currently under investigation and a relief flight is being arranged to transport passengers onwards to Doha. We apologise for the inconvenience to our passengers who will be assisted with their onward travel plans: Qatar Airways
— ANI (@ANI) March 21, 2022
कतर एअरवेजच्या या विमानात १०० प्रवासी होते. हे विमान QR579 आहे. दिल्लीहून पहाटे 3.50 मिनिटांनी ते दोह्याला निघाले होते. मात्र, साडे पाच वाजता विमानाची इमरजन्सी लँडिंग करण्यात आली. कतर एअरवेजने याबाबत माहिती दिली असून आम्ही प्रवाशांना झालेल्या असुविधेबाबत माफी मागत असल्याचे म्हटले आहे.