कतार विवाद : आम्हाला फक्त भारतीयांची चिंता - सुषमा स्वराज

By admin | Published: June 5, 2017 10:36 PM2017-06-05T22:36:19+5:302017-06-05T22:48:56+5:30

सौदी अरेबियासर आखाती देशातील राष्ट्रांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोतण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारताने आज आपली भूमिका

Qatar dispute: We only worry about Indians - Sushma Swaraj | कतार विवाद : आम्हाला फक्त भारतीयांची चिंता - सुषमा स्वराज

कतार विवाद : आम्हाला फक्त भारतीयांची चिंता - सुषमा स्वराज

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सौदी अरेबियासर आखाती देशातील राष्ट्रांनी कतारशी असलेले राजकीय संबंध तोतण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारताने आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कतारवरून निर्माण झालेला विवाद हा आखाती देशांचा अंतर्गत प्रश्न असून, आम्हाला फक्त तेथे राहणाऱ्या भारतीयांचीच चिंता असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. 
 
कतारबाबत आखाती देशांनी घेतलेल्या निर्णयाचा या देशांशी असलेल्या भारताच्या संबंधांवर परिणाम होणार नसल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सुषमा स्वराज म्हणाल्या, "कतारबाबत इतर आखाती देशांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमच्यासमोर कोणत्याही प्रकारचे आव्हान निर्माण झालेले नाही. हा आखाती देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र आम्हाला तेथे राहत असलेल्या भारतीयांची चिंता आहे आणि तेथे कुणी भारतीय अडकलेला नाही ना याचा तपास आम्ही करत आहोत."  आखाती देशामध्ये अशा घटना याआधीही घडल्या आहेत आणि परिस्थिती लवकरच सुधरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 
 
दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली होती. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला. बहारिनने आज सकाळी कतारसोबत आपले संबंध तोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. दहशतवादाला समर्थन देण्याव्यतिरिक्त आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये कतार ढवळाढवळ करत असल्याचेही बहारिनने म्हटले होते.  
 
या चारही देशांनी कतासबोत फक्त राजकीय संबंधच नाही तर हवाई आणि समुद्री संपर्कही तोडण्याची घोषणा केली . बहारिनने कतारमध्ये राहत असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत येण्यासाठी 14 दिवसांची वेळ दिला आहे. सौदी अरेबियाने आपल्या निर्णयाची माहिती देताना दहशतवाद आणि कट्टरपंथीयांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे.  
 

Web Title: Qatar dispute: We only worry about Indians - Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.