सवाल ठरले गुन्हेगारी : ४२ दिवस सुटका नाही झाली, नोकरीही गमवावी लागली; समाज माध्यमांवरील प्रश्नांमुळे तो गेला तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:22 AM2017-10-12T01:22:08+5:302017-10-12T01:22:19+5:30

समाजमाध्यमांवर काही पोस्ट करताना किंवा काही भाष्य, मते व्यक्त करताना खूप काळजी घ्यावी लागेल. अन्यथा झाकिर अली (१८) याला ४२ दिवस तुरुंगात काढावे लागले, तशी वेळ येऊ शकते.

Question became criminal: 42 days was lost, job loss; He was imprisoned due to questions on social media | सवाल ठरले गुन्हेगारी : ४२ दिवस सुटका नाही झाली, नोकरीही गमवावी लागली; समाज माध्यमांवरील प्रश्नांमुळे तो गेला तुरुंगात

सवाल ठरले गुन्हेगारी : ४२ दिवस सुटका नाही झाली, नोकरीही गमवावी लागली; समाज माध्यमांवरील प्रश्नांमुळे तो गेला तुरुंगात

googlenewsNext

नवी दिल्ली : समाजमाध्यमांवर काही पोस्ट करताना किंवा काही भाष्य, मते व्यक्त करताना खूप काळजी घ्यावी लागेल. अन्यथा झाकिर अली (१८) याला ४२ दिवस तुरुंगात काढावे लागले, तशी वेळ येऊ शकते. झाकीर अलीने राम मंदिर बांधण्याच्या भाजपच्या आश्वासनावर समाजमाध्यमांवर वाद घातला आणि हज यात्रेसाठीचे अनुदान केंद्र सरकार का रद्द करीत नाही, असे मुद्दे उपस्थित केले. हे भाष्य उत्तर प्रदेश पोलिसांच्या दृष्टीने ‘गुन्हेगारी’ ठरले.
त्याला त्यासाठी मुजफ्फरनगर तुरुंगात कुख्यात गुन्हेगारांसोबत ४२ दिवस काढावे लागले. त्याच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ अन्वये आरोप ठेवून गेल्या २ एप्रिलच्या रात्री अटक झाली. त्याची ४२ दिवसांनंतर सुटका झाली असली तरी आरोपपत्रात पोलिसांनी देशद्रोहाचे कलम १२४ ए समाविष्ट केले आहे, असे त्याचे वकील काझी अहमद यांनी सांगितले. तो स्थानिक मदरशातील कार्यक्रमावरून आल्यानंतर आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, असे सांगून पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. तुझी काही तासांत सुटका होईल, असे मला सांगितले गेले होते, असे त्यागी वार्ताहरांशी बोलताना म्हणाला. पण ४२ दिवस तो तुरुंगातच होता. झाकीर अली ट्रकवर आठ हजाराच्या वेतनावर काम करायचा आता त्याची ती नोकरीही गेली. अटक झाली, त्या रात्री मला कोठडीत वाईट वागवले गेले, दहशतवादी म्हणून संबोधण्यात आले. त्याच्या फेसबुकवरील काही कॉमेंटसचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एका पोस्टमध्ये तो म्हणाला होता की गंगेला आता पवित्र अस्तित्व म्हणून जाहीर केले गेले आहे. त्यामुळे आता कोणी गंगेत बुडाला तर त्याच्यावर गुन्हेगारी आरोप ठेवणार का?
काय लिहिले होते?-
दुसºया पोस्टमध्ये त्यागीने हज यात्रेचे एअर इंडियाला दिले जाणारे अनुदान केंद्र सरकार रद्द का करत नाही, असे विचारले होते. राम मंदिर बांधण्याचे सरकारने दिलेले आश्वासन हे निवडणुकीसाठी केलेला खेळ होता व नंतरच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा हेच आश्वासन दिले जाईल, असेही त्याने फेसबुकवर म्हटले होते.
जामिनासाठीच्या दुसºया अर्जावर न्यायालयाने प्रकरण गंभीर असल्याचे म्हटल्यामुळे त्यागीला ४२ दिवस तुरुंगात काढावे लागले. त्याला दिलासा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे त्याच्या वकिलाने सांगितले. प्रख्यात कायदेतज्ज्ञ व मानवी अधिकारांसाठी प्रयत्न करणारे अ‍ॅड कॉलिन गोन्सालविस यांच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Question became criminal: 42 days was lost, job loss; He was imprisoned due to questions on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.