लाहोरच्या प्रदूषणाला सरकार जबाबदार कसे?, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:52 AM2017-11-11T04:52:15+5:302017-11-11T04:52:36+5:30

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, लाहोरमधील प्रदुषणासाठी दिल्ली सरकारला जबाबदार कसे धरता?

The question of Chief Minister Arvind Kejriwal, how can the government be responsible for the pollution of Lahore? | लाहोरच्या प्रदूषणाला सरकार जबाबदार कसे?, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सवाल

लाहोरच्या प्रदूषणाला सरकार जबाबदार कसे?, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सवाल

Next

संतोष ठाकूर
नवी दिल्ली : दिल्ली आणि परिसरात शुक्रवारी चौथ्या दिवशी धूरमिश्रित धुक्याची चादर कायम होती. यामुळे लोकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबरपासून ५ दिवस वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. यावरुन एनजीटीने दिल्ली सरकारला धारेवर धरले आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, लाहोरमधील प्रदुषणासाठी दिल्ली सरकारला जबाबदार कसे धरता?
सम-विषम काळात दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (डीटीसी) आणि क्लस्टर बसमध्ये प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. डीटीसीकडे ४००० बस आहेत, तर १६०० क्लस्टर बस आहेत. मेट्रोशिवाय दिल्लीतील नागरिक या बसमधून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. सम-विषम योजना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत लागू असणार आहे. मात्र यावर हरीत लवादाने शंका उपस्थित केली आहे.

आम्ही नाही जबाबदार - केजरीवाल
प्रदूषणाविषयी काळजी व्यक्त करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमचे सरकार सर्व उपाययोजना
करत आहे, पण लाहोरमधील प्रदूषणाबाबतही जबाबदार ठरविणे हास्यास्पद आहे. भाजपाचे सरकार असलेल्या हरयाणातील गाजियाबाद, फरीदाबाद, गुडगावमध्ये याहून अधिक मोठी समस्या आहे. त्याबद्दल भाजपा बोलायला तयार काही. ही समस्या पंजाब, हरयाणातील शेतांत जो कृषी कचरा जाळला जात आहे, त्यामुळेच दिल्लीत समस्या निर्माण झाली आहे. त्या राज्यांत योग्य ती पावले उचलण्याऐवजी दिल्ली सरकारकडून पैसे मागून लक्ष विचलित केले जात आहे.

Web Title: The question of Chief Minister Arvind Kejriwal, how can the government be responsible for the pollution of Lahore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.