लोकसभेत महाराष्ट्रापासून प्रश्नांचा प्रारंभ

By admin | Published: July 8, 2014 12:50 AM2014-07-08T00:50:26+5:302014-07-08T00:50:26+5:30

शेतक:यांच्या हितासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराला सरकार प्रोत्साहन देईल.

Question of introduction from Maharashtra in Lok Sabha | लोकसभेत महाराष्ट्रापासून प्रश्नांचा प्रारंभ

लोकसभेत महाराष्ट्रापासून प्रश्नांचा प्रारंभ

Next
नवी दिल्ली : शेतक:यांच्या हितासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापराला सरकार प्रोत्साहन देईल. वापर अधिकाधीक व्हावा व उत्पादनास गती यावी यासाठी सरकार  काही सवलती देण्याचाही विचार करत आहे, असे पेट्रोलियम राज्यमंत्री धमेंद्र प्रधान यांनी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांच्या उत्तरात सांिगतले. 
विशेष म्हणजे, 16 व्या लोकसभेतील प्रश्नोत्तराला प्रारंभ महाराष्ट्रातील प्रश्नापासून झाला. खा. अहीर यांनी राज्यमंत्री प्रधान यांना विचारला. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. 
जेणोकरून साखर कारखान्यांच्या अर्थव्यवहाराला चालना मिळेल. पाचहून दहा टक्क्यांर्पयत पेट्रोलमध्ये मिश्रण अनिवार्य कधी करणार, यावर प्रधान म्हणाले, पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या पाच टक्के वापराला दहा वर्षापूर्वी परवानगी दिली गेली. मात्र शेतकरी व साखर कारखान्यांना योग्य प्रोत्साहन न मिळाल्याने 
उत्पादनाचे लक्ष्य आपण गाठू शकलो नाही. 
सध्या देशभर 1.37 टक्केच उत्पादन होते, जे पाच टक्के ठरविले होते. इंडियन शूगर मील असोसिएशनने 25 टक्के र्पयत उत्पादन करू, असा प्रस्ताव दिला आहे. त्यावर सरकार विचार करत आहे. मात्र प्रस्ताव दिला जातो, प्रत्यक्षात उत्पादन कमी होते.  मार्केटिंगच्या समस्या त्याला कारणीभूत ठरत आहे. 
सध्या रिफायनरीतून 48 रूपये दराने पेट्रोल मिळते. त्यामध्ये इथेनॉलचा वापर झाला तर कृषीव्यवस्था बळकट होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात इथेनॉलला मागणी आहे. त्यामुळे इथेनॉलच्या निर्यातीकडेही सरकार लक्ष देईल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: Question of introduction from Maharashtra in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.