तरुणांचा प्रश्न, नोक-या गेल्या कुठे? गुजरातमध्ये रोजगार शोधणा-यांचा मार्ग खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:27 AM2017-12-13T01:27:13+5:302017-12-13T01:27:43+5:30

गुजरातमधील महामार्ग भलेही गुळगुळीत असतील; पण रोजगार शोधणा-या अनेक तरुणांचा मार्ग खूपच खडतर आहे. चांगले वेतन आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे.

The question of young people, where are they? The path to employment seekers in Gujarat is tough | तरुणांचा प्रश्न, नोक-या गेल्या कुठे? गुजरातमध्ये रोजगार शोधणा-यांचा मार्ग खडतर

तरुणांचा प्रश्न, नोक-या गेल्या कुठे? गुजरातमध्ये रोजगार शोधणा-यांचा मार्ग खडतर

Next

राधनपूर/ पाटण : गुजरातमधील महामार्ग भलेही गुळगुळीत असतील; पण रोजगार शोधणा-या अनेक तरुणांचा मार्ग खूपच खडतर आहे. चांगले वेतन आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे. चायना मेड स्मार्टफोन आणि इअर फोनमध्ये गुंग झालेले असे अनेक तरुण दिसतील. आपल्या समस्यांपासून स्वत:ला दूर करीत हे तरुण फोनच्या माध्यमातून आभासी दुनियेत प्रवेश करतात. कधी बॉलीवूडचे गाणे तर कधी आणखी काही... त्यांच्यासाठी एवढाच दिलासा असतो.
पाटणहून कच्छच्या गांधीधामला जाणारा प्रिंस परमार (२३) हा भूमिहीन शेतकºयाचा मुलगा. तो गांधीनगरमध्ये एका कपड्याच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. मासिक वेतन आहे १० हजार रुपये. दलित समुदायातील हा तरुण सांगतो की, आपण तीन दिवस जरी सुटी घेतली, तर अर्धा पगार कपात होतो. आपला राग काढत तो या पत्रकारालाच विचारतो की, तुम्ही किती कमावता? तुमचे शिक्षण काय आहे? गुजरातमध्ये दुसºया टप्प्यात १४ डिसेंबर रोजी होणाºया मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रिंससारख्या तरुणांचा प्रश्न आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. सत्तेच्या लढाईतील पक्षांनाही हा संदेश आहे.
उत्तर गुजरातच्या ५५० किमी प्रवासात एक बाब दिसून आली की, राज्यातील तरुणांना ‘व्हाइट कॉलर’ जॉबबाबत खूप उत्सुकता आहे. राधनपूरचा वसीमभाई महबूबभाई आपल्या दोन मित्रांसह काँग्रेसच्या निवडणूक कार्यालयात आला आहे. तो सांगतो की, शाळेनंतर त्याने आयटीआयचे प्रशिक्षण घेतले आहे. उपजीविकेसाठी तो लहानसहान कामे करतो, असे एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगताच महबूब म्हणाला की, हा चुकीचे बोलतोय. मी एका चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. परिस्थितीमुळे आपण शाळा सोडल्याचे तो सांगतो. त्याचे वडील ड्रायव्हर असून, महिना ५००० रुपये मिळवितात. हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वातील आरक्षणाच्या आंदोलनात तरुणांचा हाच राग दिसून आलेला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर लघु आणि मध्यम उद्योगांना आणि पर्यायाने रोजगाराला फटका बसल्याचे सांगितले जाते.

Web Title: The question of young people, where are they? The path to employment seekers in Gujarat is tough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.